शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मालक असावा तर अस्सा! सगळीकडे कपात सुरू असताना कर्मचाऱ्यांना VCवर सुखद धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2020 7:47 PM

1 / 12
कर्मचाऱ्यांच्या जीवावर कोट्यवधींची कमाई करणारे मालक खूप असतात. पण संकटाच्या काळात त्याच कर्मचाऱ्यांच्या पाठिशी उभ्या राहणाऱ्या मालकांची संख्या मात्र कमी असते.
2 / 12
कोरोनाच्या संकटात तर जवळपास सगळ्याच कंपन्यांनी वेतन कपात सुरू केली आहे. काहींनी तर कर्मचाऱ्यांची संख्यादेखील कमी करण्यास सुरुवात केली आहे.
3 / 12
अमेरिकेतला कोरोनाचा कहर पाहता बऱ्याच कंपन्या कर्मचारी कपात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाखो लोकांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे.
4 / 12
कोरोनामुळे कंपन्यांना आर्थिक फटका बसत असताना एका मालकानं मात्र आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला आहे.
5 / 12
बाकीच्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीचे वारे वाहत असताना द कॉनर समूहाचे संस्थापक आणि मालक लॅरी कॉनर यांनी अवघ्या ८ दिवसांत शेअर बाजारात १२ कोटी रुपये (१.६ मिलियन अमेरिकन डॉलर) कमावले.
6 / 12
कोरोना संकटामुळे बाजारात निर्माण झालेल्या फायदा घेत लॅरी कॉनर यांनी १२ कोटींची कमाई केली.
7 / 12
यानंतर लॅरी कॉनर यांनी वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.
8 / 12
देशात कोरोनाचं मोठं संकट आणि याच पार्श्वभूमीवर सीईओंची व्हिडीओ कॉन्फरन्स यामुळे कर्मचारी चिंतेत होते.
9 / 12
कॉनर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये अपेक्षेप्रमाणे मोठी घोषणादेखील केली. मात्र ती कर्मचारी किंवा पगार कपातीची नव्हती. तर बोनसची होती.
10 / 12
सगळीकडून केवळ कपातीच्या घोषणा, चर्चा ऐकू येत असताना कॉनर यांनी शेअर बाजारातून कमावलेले १२ कोटी रुपये बोनस म्हणून जाहीर केले.
11 / 12
कोरोना संकटाच्या काळात कर्मचारी अतिशय तन्मयतेनं घरुन काम करत आहेत. त्यांच्या या कामाचा आपण आदर करतो, अशा भावना कॉनर यांनी बोनसची घोषणा करताना व्यक्त केल्या.
12 / 12
द कॉनर समूहात ४०० कर्मचारी काम करतात. ही कंपनी रिअल इस्टेट क्षेत्रात काम करते.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या