शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दररोज ₹8 रुपये खर्च, मिळणार 2GB डेटा, मोफत कॉलिंग आणि Disney+ Hotstar

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 3:42 PM

1 / 7
तुम्हाला दर महिन्याला रिचार्ज करण्याच्या त्रासाचा कंटाळा आला असेलव् तर तुम्ही या दीर्घ वैधता असलेल्या प्लॅन्सचा लाभ घेऊ शकता. वर्षभराचे प्लॅन्स सहसा 365 दिवसांच्या वैधतेसह येतात.
2 / 7
आज आम्ही तुमच्यासाठी Airtel आणि Vodafone च्या वर्षभर चालणार्‍या स्वस्त प्लॅन्सची माहिती घेऊन आलो आहोत. तुम्हाला कमी किमतीत भरपूर फायदे देणारे प्लॅन खरेदी करता येतील. चला तर मग जाणून घेऊया तपशील.
3 / 7
Vodafoone Idea आपल्या ग्राहकांना काही भन्नाट ऑफर्ससह तीन प्रीपेड प्लॅन्स ऑफर करत आहे. यापैकी पहिला प्लॅन 1799 रुपयांचा आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस ऑफर केले जातात. याशिवाय 24 जीबी डेटाही दिला जातो. या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. तसंच यात वीय मुव्हीज आणि टीवीचाही लाभ घेता येतो.
4 / 7
इतर दोन प्लॅन्स डेली डेटा प्लॅन आहेत. यापैकी एका प्लॅनची किंमत 2,899 रुपये आहे तर दुसऱ्या प्लॅनची किंमत 3,099 रुपये आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल आणि दररोज 100 एसएमएस तसंच रोज 1.5GB डेटा मिळतो. फरक एवढाच आहे की 3,099 रुपयांच्या प्लॅनमध्ये Disney + Hotstar चं वार्षिक सबस्क्रिप्शन दिलं जातं.
5 / 7
याशिवाय दोन्ही प्लॅन्समध्ये बिंज ऑल नाईट फीचरही देण्यात आलं आहे. यात ग्राहकांना रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत मोफत इंटरनेटचा वापर करता येतो. तसंच विकेंड डेटा रोलओवरचा लाभही घेता येतो. याशिवाय ग्राहकांना दर महिन्याला 2GB डेटा बॅकअप कोणत्याही अतिरिक्त किंमतीशिवाय मिळतं.
6 / 7
एअरटेलही वोडाफोन आयडिया प्रमाणेच प्लॅन देत आहे. परंतु त्यांची किंमत थोडी निराळी आहे. 1799 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो. तसंच यात एकूण 24 जीबी डेटा आणि 365 दिवसांसाठी एकूण 3600 एसएमएस देण्यात येतात.
7 / 7
अन्य दोन प्लॅन्स 2999 रुपये आणि 3359 रुपयांचे आहेत. यात दररोज 2 जीबी डेटा देण्यात योतो. कसंच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएसचा लाभही देण्यात येतो. याशिवाय 3599 रुपयांच्या प्लॅनमध्ये Disney+ Hotstar चं वार्षिक सबस्क्रिप्शनही देण्यात येतं. याशिला सर्व प्लॅन्समध्ये अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ मोबाइल, विंक म्युझिक, शॉ अॅकेडमी, हॅलोट्यून्स आणि अन्य बेनिफिट्सही मिळतात.
टॅग्स :AirtelएअरटेलVodafoneव्होडाफोनIdeaआयडिया