countries where petrol diesel rates are cheapest
'या' देशांमध्ये मिळतंय कवडीमोल भावात पेट्रोल; किंमत जाणून बसेल धक्का By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 5:09 PM1 / 7जगात कच्च्या तेलाच्या किमती अनेकदा वाढतात किंवा कमी होतात. त्यामुळं इतर देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ किंवा घट होताना दिसून येते. दरम्यान, असे अनेक देश आहेत जिथे तेलाच्या किमती खूप जास्त आहेत. तर अनेक देशांमध्ये कमी आहेत. 2 / 7आम्ही तुम्हाला जगातील अशा देशांबद्दल सांगत आहोत, जिथे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती इतक्या कमी आहेत की, तुमच्या कारची टाकी अवघ्या काही रुपयांत भरून जाईल.3 / 7या यादीत पहिले नाव व्हेनेझुएलाचे आहे. या देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर जगात सर्वात कमी आहेत. व्हेनेझुएलामध्ये पेट्रोलची किंमत १३ सेंट प्रति लिटर आहे. व्हेनेझुएलामध्ये तेलाचे प्रचंड साठे आणि सामाजिक धोरणांमुळे किंमती कमी आहेत. पण देशाची अर्थव्यवस्था एवढी कमकुवत आहे की एवढ्या कमी किमती असूनही लोक पेट्रोल आणि डिझेल खरेदी करू शकत नाहीत.4 / 7व्हेनेझुएलानंतर इराणमध्ये पेट्रोलचे दर सर्वात कमी आहेत. इराणमध्ये पेट्रोलची किंमत १५००० इराणी रियाल प्रति लीटर आहे, जी भारतीय चलनात बदलल्यास किंमत ३० रुपये प्रति लिटर होईल.5 / 7लिबियामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जगात तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारतीय चलनानुसार तुम्हाला येथे एक लिटर पेट्रोल ४० रुपयांना मिळेल.6 / 7इजिप्त हा भारताच्या जवळचा देश आहे. भारताचा बराचसा व्यापार इजिप्तसोबत होत असतो. या देशात पेट्रोल आणि डिझेल खूप स्वस्त आहे. इजिप्तमध्ये एक लिटर पेट्रोल घेण्यासाठी तुम्हाला २५.९९ रुपये मोजावे लागतील.7 / 7अल्जेरिया हा जागतिक वायू आणि तेल बाजारातील मोठा देश आहे. येथे एक लिटर पेट्रोलची किंमत ४५ अल्जेरियन दिनार आहे, जी भारतीय चलनात २९.१६ रुपये आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications