COVID 19 effect SBI to update KYC through post or registered email-ID due to lockdown
State Bank कडून ग्राहकांना दिलासा; घरबसल्या KYC करता येणार अपडेट By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 2:02 PM1 / 10सध्या देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर देशात अनेक राज्यांनी निर्बंध लागू केले आहेत. यादरम्यान आपल्या ग्राहकांना स्टेट बँकेनं मोठा दिलासा दिला आहे.2 / 10कोणत्याही खातेधारकाला केव्हायसी अपडेट करण्यासाठी बँकेत बोलावण्याची गरज नसल्याचे निर्देश स्टेट बँकेनं दिले आहेत. 3 / 10याशिवाय ३१ मे पर्यंत सर्व ग्राहकांना पोस्ट किंवा ईमेलद्वारे केव्हायसी अपडेच करण्याची मुभाही बँकेनं दिली आहे. 4 / 10स्टेट बँकेनं एका ट्वीटद्वारे याची माहिती दिली. कोरोनाच्या महासाथीमुळे देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं बँकेनं म्हटलं आहे. 5 / 10कोणत्याही ग्राहकाला केव्हायसी अपडेट करण्यासाटी पोस्ट किंवा रजिस्टर ईमेलद्वारे ते करण्याची मुभा देण्यात आल्याचं बँकेनं म्हटलं आहे. 6 / 10ग्राहकांना यासाठी बँकेच्या कोणत्याही शाखेत जाण्याची गरज नसल्याचंही स्टेट बँकेनं स्पष्ट केलं आहे. परंतु केव्हायसी न केल्यास खात्यावरून होणाऱ्या देवाणघेवाणीवर रोख लावण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं. 7 / 10बँक लो रिस्कवाल्या ग्राहकांना दरवर्षी केव्हायसी अपडेट करण्यास सांगते. तर मीडियम रिस्क असलेल्या ग्राहकांना आठ वर्षांनंतर केव्हायसी अपडेट करण्यास सांगतं. तकर हाय रिस्क वाल्या ग्राहकांना दर दोन वर्षांनी केव्हायसी अपडेट करावी लागते. 8 / 10केव्हायसीसाठी ग्राहकांना आपल्या पत्त्याचा आणि आयडी प्रुफ द्यावं लागतं. प्रत्येक निराळ्या खात्यांसाठी स्टेट बँकेनं एक यादी तयार केली आहे. 9 / 10जर खातेधारकाचं वय १० वर्षांपेक्षा कमी असेल, तर अशा परिस्थितीत त्यांचं खातं ऑपरेट करणाऱ्यांचं केव्हायसी अपडेट करावं लागेल. 10 / 10जर तुम्ही एनआरआय असाल आणि तुमचं स्टेट बँकेत खातं असेल तर तुम्ही पासपोर्ट किंवा रेसिडेंस व्हिजा कॉपी देऊ शकता. रेसिडेंस व्हिसा कॉपी फॉरेन ऑफिसर्स, नोटरी, एम्बेसी किंवा संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यानं पडताळलेली असणं अनिवार्य आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications