शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Credit Card : क्रेडिट कार्डचा वापर करताय? 'या' गोष्टी कायम लक्षात ठेवा, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 7:39 PM

1 / 6
नवी दिल्ली : जर तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करत असाल आणि पेमेंटसाठी क्रेडिट कार्डचा अधिक वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सध्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत आपणही त्याला बळी पडू नये, म्हणून काही विशेष खबरदारी घेणे खूप गरजेचे आहे. निष्काळजीपणामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे जोखीम टाळण्यासाठी 'या' 5 गोष्टी कायम लक्षात ठेवा, अन्यथा....
2 / 6
वाढत्या डिजिटायझेशनमुळे बहुतेक क्रेडिट कार्ड कॉन्टॅक्टलेस व्यवहारांची सुविधा देत आहेत. पण, ती तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतात. दरम्यान, हे फीचर पिन प्रविष्ट न करता पेमेंट सक्षम करते. पण, चुकून तुमचे कार्ड हरवले आणि चुकीच्या हातात पडले तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे हे फीचर बंद करणे चांगले ठरू शकेल.
3 / 6
क्रेडिट कार्ड धारक आपल्या गरजेनुसार पॉइंट ऑफ सेल (POS) वर ट्रांजेक्शन लिमिट सेट करू शकतो. या अंतर्गत, जर तुम्ही सामान्यतः 5,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांसाठी कार्ड वापरत नसाल, तर तुम्ही तेवढीच ट्रांजेक्शन लिमिट सेट करू शकता. असे केल्यामुळे तुमचे क्रेडिट कार्ड एकाच वेळी या मर्यादेपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार करू शकणार नाही.
4 / 6
जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि परदेशात सहलीला जात नसाल, तर तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यवहार थांबवण्याचा पर्याय निवडू शकता. गरज भासल्यास तो पुन्हा सुरूही करता येईल. कोणतेही आंतरराष्ट्रीय ई-कॉमर्स किंवा ऑनलाइन व्यवहार मर्यादित करणे किंवा निष्क्रिय करणे अधिक चांगले होईल, कारण बहुतेक आंतरराष्ट्रीय ऑनलाइन व्यवहार साधारणपणे OTP शिवाय पूर्ण होतात.
5 / 6
क्रेडिट कार्ड कंपन्या कार्डची मर्यादा वाढवण्यासाठी ग्राहकांना संदेश पाठवतात आणि युजर्स ती वाढवत राहतात. त्यांच्या गरजा कमी असल्या तरीही ते करतात. पण तुमच्या गरजेनुसार क्रेडिट कार्डची मर्यादा ठेवणे चांगले करू शकते. म्हणजेच जेव्हा गरजा कमी असतील, तेव्हा मर्यादा कमी करा, यामुळे निश्चित रकमेपेक्षा जास्त क्रियाकलाप आपोआप ब्लॉक होईल. गरज भासल्यास मर्यादा वाढवता येऊ शकते.
6 / 6
बँकेने ठरवून दिलेल्या मर्यादेपर्यंतची रोकड काढण्याची सुविधाही क्रेडिट कार्डवर दिली जाते, परंतु तसे करणे टाळले पाहिजे. पैसे काढण्यासाठी क्रेडिट कार्डऐवजी डेबिट कार्ड वापरल्यास चांगले ठरू शकते. कारण, ज्या दिवशी तुम्ही क्रेडिट कार्डमधून पैसे काढता, त्या दिवशी त्यावर व्याजही जमा होऊ लागते. अशा परिस्थितीत, जर फार महत्वाचे नसेल, तर क्रेडिट कार्डमधून पैसे काढणे टाळायला पाहिजे.
टॅग्स :bankबँकbusinessव्यवसाय