शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Credit Score : वेळेवर EMI भरुनही क्रेडिट स्कोअर कमी झाला? वाचा नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 1:07 PM

1 / 8
सध्याच्या काळात क्रेडिट स्कोअर महत्वाचा आहे. हा स्कोअर जर कमी झाला तर तुम्हाला बँक कर्ज देणार नाही. क्रेडिट स्कोअर मेंटेन ठेवण्यासाठी, आपण कर्जाचा ईएमआय वेळेवर भरतो. EMI पेमेंटमध्ये २ महिने सतत विलंब होत असल्यास क्रेडिट स्कोअर खराब होतो.
2 / 8
काही जण ईएमआय वेळेवर भरुनही त्यांचा क्रेडिट स्कोअर खराब असतो. यामागे काही कारण असू शकतात.
3 / 8
तुम्ही वेळेवर ईएमआय भरल्यास आणि क्रेडिट कार्ड बिलामध्ये किमान देय रक्कम भरल्यास, त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत, क्रेडिट स्कोअर दुरुस्त करण्यासाठी, वापरकर्त्यांना काही महिन्यांसाठी पूर्ण पेमेंट करावे लागेल. पूर्ण देयक काही महिन्यांनंतरच क्रेडिट स्कोअर योग्य होईल.
4 / 8
जरी तुम्ही एका कर्जासाठी ईएमआय भरत असाल आणि त्यासोबत दुसरे कर्ज घेतले असेल तरीही तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो.
5 / 8
स्कोअर दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही एका कर्जाचे एकवेळ पेमेंट करावे लागेल. जर तुम्ही असं केल्यास तुमचा क्रेडिट स्कोर सुधारेल.
6 / 8
पहिल्यांदा तुम्ही https://www.cibil.com/ वर जा. आता तुम्हाला 'Get your CIBIL Score' वर क्लिक करावे लागेल.
7 / 8
यानंतर तुमचे नाव, ई-मेल आयडी आणि पासवर्ड भरा आणि आयडी प्रूफ सबमिट करा. यानंतर, पिन कोड, जन्मतारीख आणि फोन नंबर भरा आणि एक्सेप्ट करा आणि पुढे सुरू ठेवा.
8 / 8
आता मोबाईल फोनवर मिळालेला OTP टाका आणि 'Continue' वर क्लिक करा. यानंतर, डॅशबोर्डवर जाऊन, तुमचा क्रेडिट स्कोर दर्शविला जाईल.
टॅग्स :businessव्यवसायbankबँक