शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कर्ज हवे असल्यास 'या' गोष्टीकडे खास लक्ष द्या; बँका किंवा नॉन-बँकिंग कंपन्या त्वरित करतील मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 7:00 PM

1 / 11
नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे अर्थिक घडामोडींवर मोठा परिणाम झाला आहे. तसेच, अनेक उद्योगांना याचा फटका बसला आहे. मात्र, आता कोरोना संसर्गाचा धोका कमी होत असल्यामुळे अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याचे दिसून येत आहे.
2 / 11
या संकटकाळातून बाहेर येण्यासाठी आणि आपल्या उद्योग, व्यवसायाला उभारी देण्यासाठी अनेकांना पैशांची गरज आहे. त्या व्यतरिक्त वैयक्तिक बाबींचा खर्च भागवण्यासाठी कर्जाची (Loan) आवश्यकता आहे.
3 / 11
कोणत्याही बँकेकडून किंवा नॉन फायनान्स कंपनीकडून कर्ज घेण्यासाठी क्रेडिट स्कोअर (Credit Score) हा घटक महत्वाचा असतो. क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर कर्ज तसेच कर्जाची रक्कम वाढीव मिळण्याची शक्यता वाढते.
4 / 11
ज्या व्यक्तीने कर्जसाठी अर्ज केला आहे त्या व्यक्तीला कर्ज देता येऊ शकते का, कर्ज देण्यात जोखीम नाही ना तसेच किती रक्कम कर्ज म्हणून देता येईल, या बाबी क्रेडिट स्कोअरमुळे स्पष्ट होतात.
5 / 11
क्रेडिट स्कोअरच्या मदतीमुळे बँका किंवा नॉन फायनन्स कंपन्यांना (NBFC) हे माहीत असते की, ज्या व्यक्तीने कर्जासाठी अर्ज केला आहे, त्याची कर्ज परत करण्याची स्थिती (रीमेमेंट हिस्ट्री) कशी आहे.
6 / 11
तसेच, संबंधित व्यक्तीने यापूर्वी कर्ज परतफेड काही चुका केल्या आहेत की नाही, या सर्व गोष्टी क्रेडिट स्कोअरच्या मदतीने ठरविल्या जातात. त्यामुळे कर्जासाठी अर्ज करताना तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी क्रेडिट स्कोअरशी संबंधित अधिक माहिती जाणून घ्या....
7 / 11
क्रेडिट स्कोअरमुळे तुमच्या आधीच्या कर्जाविषयी माहिती मिळते. जर क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कर्ज मिळू शकते. जर तुम्ही ईएमआय (EMI) वेळच्यावेळी भरत असाल तर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला राहतो. क्रेडिट स्कोअर हा 300 ते 900 या अंकांदरम्यान असतो. जर कोणत्याही व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर 750 किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर त्यास कर्ज अगदी सहजपणे मिळू शकते. क्रेडिट स्कोअरमध्ये मागील 24 महिन्यांच्या क्रेडिट हिस्ट्रीचा समावेश असतो.
8 / 11
जर एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर त्यास कर्ज मिळवताना जास्त अडचणी येत नाहीत. मात्र, हा क्रेडिट स्कोअर चांगला ठेवण्यासाठी वेळेवर बिले भरणे आवश्यक आहे. याशिवाय, सातत्याने क्रेडिट स्कोअरचा आढावा घेणे गरजेचे आहे. गरजेनुसार को-ब्रांडेड कार्ड घ्या. वीजबिलापासून ते विमा प्रिमियमपर्यंतच्या सर्व रकमा वेळच्या वेळी भराव्यात. तसेच ,गॅरंटी देणाऱ्याच्या कर्ज खात्यावर लक्ष ठेवावे.
9 / 11
क्रेडिट कार्ड स्कोअर तयार करण्यासाठी काही गोष्टी ध्यानात घेणं आवश्यक आहे. वेळेवर कर्ज परतफेड करण्यासाठी क्रेडिट स्कोअरचा वाटा हा 30 टक्के असतो. सुरक्षित किंवा असुरक्षित कर्जाचा वाटा 25 टक्के असतो. गृहकर्ज (Home Loan), कार लोन (Car Loan) यांसारख्या बाबींचा सुरक्षित कर्जात तर पर्सनल लोन (Personal Loan) सारख्या बाबींचा असुरक्षित कर्जात समावेश होतो. क्रेडिट स्कोअरसाठी क्रेडिट एक्सपोजर 25 टक्के असते. कर्ज वापरासाठी क्रेडिट स्कोअरमध्ये 20 टक्के वाटा असतो.
10 / 11
आपला क्रेडिट स्कोअर तपासण्यासाठी www.cibil.com या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करावा. त्यासाठी तुम्हाला 550 रुपये शुल्क भरावे लागते. यासाठी एकदा ऑथेंटिकेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यानंतर तुम्हाला CIBIL स्कोअर मिळतो. हा स्कोअर तुम्हाला ई-मेलद्वारेही पाठविला जातो.
11 / 11
चांगल्या क्रेडिट स्कोअरसाठी तुम्हाला काही गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागेल. त्यात आपल्या क्रेडिट कार्डची पूर्ण मर्यादा वापरु नका. क्रेडिट कार्डवर जास्त वेळा कर्ज घेऊ नये. कर्जासाठी प्रमाणापेक्षा जास्त अर्ज करु नयेत. होम लोन आणि कार लोनला अधिक महत्व द्यावे. पर्सनल लोन घेण्याचे टाळावे. क्रेडिट कार्डबंद होणार नाही याची काळजी घ्यावी. जॉइंट अकाऊंटचा आढावा घ्यावा आणि CIBIL च्या स्कोअरची माहिती घ्या.
टॅग्स :bankबँकEconomyअर्थव्यवस्थाMONEYपैसा