शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

केएल राहुलने सासरा सुनील शेट्टींसोबत मुंबईजवळ खरेदी केली ७ एकर जमीन; काय आहे किंमत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 11:41 IST

1 / 7
भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज केएल राहुल आता व्यवसायाच्या मैदानातही उतरला आहे. केएल राहुल याने सासरा बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांच्यासोबत मुंबईजवळील ठाणे पश्चिम येथील ओवळे येथे ७ एकर जमीन खरेदी केली आहे.
2 / 7
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, या व्यवहारात ३० एकर १७ गुंठे पसरलेल्या एका मोठ्या भूखंडामध्ये ७ एकर अविभाजित जमिनीचा समावेश आहे.
3 / 7
खरेदी व्यवहारानुसार, या जमिनीच्या खरेदीसाठी ६८.९६ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि ३०,००० रुपये नोंदणी शुल्क भरण्यात आले आहे. हा व्यवहार २० मार्च २०२५ रोजी झाला आहे.
4 / 7
माहितीनुसार, ओवळे हे ठाणे पश्चिमेकडील घोडबंदर रोडवर स्थित आहे. येथे ठाणे ते मुंबईला जोडणाऱ्या प्रमुख मार्गांपैकी एक आहे. चित्रपट अभिनेते सुनील शेट्टी आणि केएल राहुल यांनी अद्याप याला कोणताही अधिकृत दुजोरा दिला नाही.
5 / 7
Indextap.com ने मिळवलेल्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, जुलै २०२४ मध्ये, केएल राहुल आणि त्याची पत्नी अथिया सुनील शेट्टी यांनी मुंबईतील वांद्रे येथील पाली हिल परिसरात २० कोटी रुपयांना अपार्टमेंट खरेदी केल्याबद्दल चर्चेत आले होते.
6 / 7
३,३५० चौरस फूट क्षेत्रफळाचे हे अपार्टमेंट बांद्राच्या पाली हिल परिसरात असलेल्या १८ मजल्यांच्या संधू पॅलेस इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आहे. स्क्वेअर यार्ड्सच्या मते, ऑक्टोबर २०२४ मध्ये, सुनील शेट्टी आणि त्यांचा मुलगा अहान शेट्टी यांनी बँक लिलावाद्वारे मुंबईत १२०० चौरस फूट मालमत्ता ८.०१ कोटींना खरेदी केली.
7 / 7
मुंबईतील खार पश्चिम भागात असलेली ही मालमत्ता वडील आणि मुलाने बँक लिलावाद्वारे खरेदी केली होती, असे स्क्वेअर यार्ड्सने म्हटले आहे.
टॅग्स :Sunil Shettyसुनील शेट्टीInvestmentगुंतवणूकIPL 2025इंडियन प्रिमियर लीग २०२५