शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Crude Oil Record Fall: खुशखबर! वर्षातील सर्वात खालच्या पातळीवर आलं क्रूड ऑईल, पेट्रोलही 84 रुपये लिटर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 11:19 AM

1 / 11
क्रूड ऑईल अर्थात कच्च्या तेलाच्या किमती वर्षभरातील सर्वात खालच्या पातळीवर आल्या आहेत. सध्या क्रूड ऑईलची किंमत प्रति बॅरल 76 डॉलरच्या जवळपास आहे. मार्च 2022 मध्ये प्रति बॅरल 129 डॉलरपर्यंत पोहोचलेल्या क्रूड ऑईलची ही या वर्षातील विक्रमी घसरण आहे.
2 / 11
रशिया-युक्रेन युद्धामुळे, बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे क्रूड ऑईलची किंमत मोठ्या प्रमाणावर वाढली होती. मात्र नंतर, या किंमतीत घसरण झाली. पण पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कुठल्याही प्रकारचा दिलासा दिसून आला नाही.
3 / 11
76 डॉलर प्रत‍ि बॅरलवर क्रूड ऑईल - गेल्या साडे सहा महिन्यांपेक्षाही अधिक काळापासून देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) कायम आहेत. मात्र, येणाऱ्या काळात ते कमी होती, असा अंदाज आहे. यापूर्वी 1 डिसेंबर 2021 रोजी क्रूडचा दर 68.86 डॉलर प्रत‍ि बॅरलवर होता.
4 / 11
ताज्या दरासंदर्भात बोलायचे झाल्यास, सोमवारी सकाळच्यासुमारास, डब्‍ल्‍यूटीआय क्रूड 71.54 डॉलर प्रत‍ि बॅरलवर दिसून आले. तसेच ब्रेंट क्रूड 76.45 डॉलर प्रत‍ि बॅरलवर पोहोचले आहे. केंद्र सरकारकडूनही 22 मे 2022 रोजी तेलावरील एक्‍साइज ड्यूटीत कपात केली होती. यानंतर तेलाच्या किंमतीत कुठल्याही प्रकारचा बदल झाला नाही.
5 / 11
एक्‍साइज ड्यूटीमध्ये कपात केल्यानंतर, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी घसरण झाली होती. या बदलानंतर, पेट्रोल 8 रुपये आणि डिझेल 5 रुपये प्रत‍ि लीटरने स्वस्त झाले होते. काही राज्यांनीही त्यावेळी व्हॅट कमी करून लोकांना दिलासा दिला होता.
6 / 11
पोर्टब्‍लेयरमध्ये पेट्रोल सर्वात स्वस्त - सध्यादेशात सर्वात स्वस्त पेट्रोल, पोर्टब्लेअरमध्ये मिळत आहे. येथे पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे.
7 / 11
शहर आणि पेट्रोल-डिझेलचा दर - पोर्टब्‍लेयरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर आहे. हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
8 / 11
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर आहे. पंजाब आणि हरियाणाची राजधानी असलेल्या चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर आहे. तर नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर आहे.
9 / 11
देशाची राजधानी दिल्ली येथे पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरवर आहे. पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटरवर आहे.
10 / 11
याच बरोबर महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये आणि डिझेलचा दर 97.28 रुपये प्रति लिटरवर आहे. राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर आहे. तर कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगलोरमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटरवर आहे.
11 / 11
तसेच, केरळची राजधानी असलेल्या तिरुवनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर आहे. ओडिशाची राजधानी असलेल्या भुवनेश्वरमध्येही पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटरवर आहे.
टॅग्स :Petrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंपDieselडिझेलCrude Oilखनिज तेलIndiaभारतMumbaiमुंबईdelhiदिल्ली