शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Petrol-diesel: कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या; पेट्रोल-डिझेलच्या किमती 8 रुपयांनी कमी होऊ शकतात, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 16:03 IST

1 / 10
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही कमी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे घडले नाही.
2 / 10
सरकार आणि सरकारी तेल कंपन्यांना हवे असल्यास पेट्रोल 8 रुपयांनी आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कच्च्या तेलाचे नोव्हेंबरमधील 80.64 डॉलरवरून डिसेंबरमध्ये 73.30 डॉलर प्रति बॅरलवर आले.
3 / 10
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, काहीवेळा राजकीय कारणांमुळे किमतीत घसरण होते, मात्र तेल कंपन्या त्यांच्या किमती कमी करण्याच्या बाजूने नाहीत.
4 / 10
ऑगस्टमध्ये, जेव्हा कच्चे तेल प्रति बॅरल $3.74 ने स्वस्त झाले, तेव्हा कंपन्यांनी किमती किरकोळ, म्हणजे केवळ 65 पैशांनी कमी केल्या.
5 / 10
सप्टेंबरमध्ये पेट्रोलची किंमत 3.33 डॉलर प्रति बॅरलने महागली तेव्हा पेट्रोलची किंमत 3.85 रुपयांनी वाढली होती. यानंतर नोव्हेंबरमध्ये कच्च्या तेलाचे दर कमी झाले, पण पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याऐवजी ते आणखी वाढले.
6 / 10
मागील पाच दिवस सलग पेट्रोलच्या दरात घसरण झाल्यानंतर काही प्रमाणात स्थिरता राहिली, डिझेलचे दरही स्थिर राहिले. येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी दिलासा मिळण्याची शक्यता तेल बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली होती, मात्र अद्याप तसे झालेले नाही.
7 / 10
आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत प्रति बॅरल सुमारे $ 50 वर आली आहे आणि वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) सुमारे $ 42 प्रति बॅरल आहे.
8 / 10
देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेलाच्या किमतीच्या आधारावर निर्धारित केल्या जातात, कारण भारत आपल्या तेलाच्या गरजेपैकी 80 टक्के तेल आयात करतो.
9 / 10
परकीय चलन बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले की, कोरोनाव्हायरसच्या ओमायक्रॉनची वाढती चिंता आणि त्याचा आर्थिक पुनरुज्जीवनावर होणारा परिणाम, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा रुपयावर परिणाम झालाय.
10 / 10
दरम्यान, डॉलरचा निर्देशांक 96.25 वर होता, जो सहा चलनांच्या तुलनेत डॉलरचा कल दर्शवितो. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड फ्युचर्स 0.22 टक्क्यांनी घसरून $79.82 प्रति बॅरलवर आले आहे.
टॅग्स :Crude Oilखनिज तेलPetrolपेट्रोलDieselडिझेल