cryptocurrency alien shiba inu ashib has jump 1900 percent 1 lakh turn 20 lakh rupees in 24 hours
जबरदस्त रिटर्न! 'या' अनोळखी Cyptocurrency नं झटक्यात गुंतवणूकदारांना केलं लखपती, २० लाखांचा फायदा By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 9:07 AM1 / 9Cryptocurrency Investment : क्रिप्टोकरन्सी मार्केट (Cyptocurrency Market) अनिश्चिततेने भरलेले आहे. याचा अंदाज क्वचितच कोणी बांधू शकेल. कोणतं क्रिप्टो गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न देईल हे कोणीही सांगता येत नाही. 2 / 9एकीकडे गेल्या अनेक दिवसांपासून डिजिटल करन्सीच्या विशेषतः बिटकॉईनच्या वाढत्या आणि घसरलेल्या किमतींमुळे गुंतवणूकदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे, मीम क्रिप्टोकरन्सीने जबरदस्त परतावा देऊन आपल्या गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे.3 / 9अनेकदा बिटकॉईनची किंमत (Bitcoin Price) घसरल्यानंतर अन्य प्रसिद्ध क्रिप्टो टोकन (popular crypto tokens) च्या किंमतींतही घसरण होताना दिसून येतं. परंतु काही कॉईन्स अशाही असतात ज्यामध्ये आश्चर्यजनकरित्या तेजीही दिसून येते.4 / 9एलियन शीबा इनु (Alien Shiba Inu-ASHIB) या क्रिप्टोकन्सीनं चोवीस तासांतच कमाल केली आहे. या क्रिप्टोकरन्सीचं नाव एका डॉग ब्रीडवर ठेवण्यात आलं आहे. 5 / 9CoinMarketCap च्या आकडेवारीनुसार Alien Shiba Inu (ASHIB) नावाच्या करन्सीची किंमत २४ तासांत १९०० टक्क्यांपर्यंत वाढली. याचा अर्थ जर एखाद्यानं २४ तासांपूर्वी ASHIB मध्ये १ लाखांची गुंतवणूक केली असेल तर एका दिवसात त्याचं मूल्य २० लाख झालं.6 / 9९ जानेवारी म्हणजेच रविवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास ASHIB $0.0075 वर व्यवहार करत होता. CoinmarketCap वेबसाइटनुसार, ASHIB कडे जास्तीत जास्त 100 दशलक्ष नाण्यांचा पुरवठा आहे.7 / 9परंतु अशाप्रकारे गुंतवणूक करण्यापासून सावध राहीलं पाहिजे. जर तुम्ही ASHIB मध्ये झालेली वाढ पाहून यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सध्या या बाबतीत फारच कमी माहिती उपलब्ध आहे.8 / 9मार्केट कॅपच्या बाबतीत हे ३३५६ व्या क्रमांकावर आहे. कोणताही क्रिप्टो तज्ज्ञ गुंतवणूकदारांना इतक्या कमी रँकच्या कॉईनमध्ये आपले पैसे गुंतवून पैसे धोक्यात टाकण्याचा सल्ला देणार नाहीत. 9 / 9इतकंच नाही तर ASHIB कोणत्याही लोकप्रिय क्रिप्टो एक्सचेंज (Crypto Exchanges) वर उपलब्ध नाही. इतकंच नाही, तर हे कोणत्याही भारतीय क्रिप्टो एक्सचेंजवरही अद्याप उपलब्ध नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications