शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Cryptocurrency : BitCoin च्या किंमतीनं पुन्हा पकडला रॉकेट स्पीड; गुंतवणूकदार झाले मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 1:05 PM

1 / 6
Cryptocurrency Bitcoin Price Hike: जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) बिटकॉइनच्या (Bitcoin) किमतीत आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळी बिटकॉइनची 47,550 डॉलर्सवर पोहोचली.
2 / 6
गेल्या आठवड्यात बिटकॉइनची किंमत 17 टक्क्यांनी वाढली आहे. यादरम्यान, गुंतवणूकदारांना जबरदस्त फायदा झाला. सध्या बिटकॉनची किंमत त्याच्या ऑल टाईम हायपेक्षा आता केवळ ३० टक्केच कमी आहे. बिटकॉइन व्यतिरिक्त, इतर क्रिप्टोकरन्सीच्या किमतीत वाढ (Cyptocurrency Price Hike) झाली आहे.
3 / 6
BitCoin व्यतिरिक्त Ether च्या किमतीत दोन टक्क्यांची वाढ झाली. त्यानंतर एका इथरची किंमत 3,388 डॉलर्स इतकी झाली आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या क्रिप्टोकरन्सीच्या मार्केट कॅपमध्येही वाढ झाली आहे.
4 / 6
तर दुसरीकडे DogeCoin च्या किंमत एका टक्क्याची घसरण दिसून आली. तर Shiba Inu च्या गुंतवणूकदारांसाठीही चांगली बातमी समोर आली आहे. या क्रिप्टोकरन्सीच्या (Shiba Inu cryptocurrency) किंमतीत 5 टक्क्यांची तेजी दिसून आली.
5 / 6
गेल्या 24 तासांमध्ये Polygon, LiteCoin, stellar, Terra, Cardano यांसारख्या क्रिप्टोकरन्सीच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. CoinGecko नुसार या काळात क्रिप्टोकरन्सीच्या मार्केट कॅपमध्ये 2 टक्क्यांची वाढ झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, क्रिप्टोकरन्सीचे मार्केट कॅप 2.23 ट्रिलियन डॉलर्स पर्यंत वाढले आहे.
6 / 6
“दीर्घ प्रतीक्षेनंतर, बिटकॉइनच्या किमती गेल्या तीन वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. मोठ्या संख्येने देश क्रिप्टोकरन्सीचे नियमन करण्याच्या दिशेने सकारात्मक दृष्टिकोन दाखवत आहेत, अशी प्रतिक्रिया ZebPay च्या राज करकरा यांनी दिली. अनेक तज्ञांच्या मते, ही फक्त एका मोठ्या तेजीची सुरुवात आहे. आता कोण किती बरोबर आहे हे येणारा काळच सांगेल, असंही ते म्हणाले.
टॅग्स :BitcoinबिटकॉइनCryptocurrencyक्रिप्टोकरन्सीInvestmentगुंतवणूक