शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Currency Printing cost: १० रुपयांपासून २००० रुपयांच्या नोटेच्या छपाईसाठी किती होतो खर्च? जाणून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 2:40 PM

1 / 8
बाजारातून काहीही घ्यायचं असो किंवा बाहेर फिरायला जायचे असो, सगळीकडे पैसे खर्च करावे लागतात. पैशाशिवाय काहीही चालत नाही. पण तुम्हाला माहित आहे का की आपण दररोज खर्च करत असलेल्या 10, 100 आणि 500 ​​रुपयांच्या नोटांचा प्रिंटिंग खर्च किती असेल?
2 / 8
म्हणजे 10 किंवा 100 रुपयांची नोट छापण्यासाठी सरकारला किती खर्च येईल? इतकंच नाही तर आपण नाणीही बाळगतो, त्या नाण्यांसाठीही सरकारला खर्च करावा लागतो. आपण यातून आज जाणून घेऊ की एका नोटेच्या छपाईसाठी सरकारला किती खर्च येतो.
3 / 8
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिझर्व्ह बँकेने 2021-22 या आर्थिक वर्षात 10 रुपयांच्या एक हजार नोटांच्या छपाईसाठी 960 रुपये खर्च केले आहेत. यानुसार, 10 रुपयांची एक नोट छापण्यासाठी सुमारे 96 पैसे मोजावे लागतात. त्याचप्रमाणे 20 रुपयांच्या एक हजार नोटांच्या छपाईसाठी 950 रुपये खर्च आला होता. म्हणजेच 20 रुपयांच्या एका नोटेची किंमत सुमारे 95 पैसे होते.
4 / 8
तर दुसरीकडे 50 रुपयांच्या एक हजार नोटांच्या छपाईसाठी 1130 रुपये, 100 रुपयांच्या एक हजार नोटांच्या छपाईवर 1170 रुपये, 200 रुपयांच्या एक हजार नोटांच्या छपाईवर 2370 रुपये आणि 500 रुपयांच्या एक हजार नोटांच्या छपाईवर 2290 रुपयांचा खर्च येतो.
5 / 8
नोटांची छपाई फक्त भारत सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार केली जाते. ते फक्त सरकारी प्रिन्टींग प्रेस (SPMCIL) छापले जातात. देशात फक्त चार सरकारी प्रिन्टींग प्रेस आहेत जिथे या नोटांची छपाई केली जाते.
6 / 8
नाशिक, देवास, म्हैसूर आणि सालबोनी अशी या ठिकाणांची नावे आहेत. इथेच नोटांची छपाई होते. ते छापण्यासाठी विशेष प्रकारची शाई वापरली जाते. त्याचं उत्पादन एका स्विस कंपनीकडून केले जाते. नोटांचा कागदही खास पद्धतीने तयार केला जातो.
7 / 8
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कागदाऐवजी कापसापासून नोटा बनवते. कागदी नोटा फार काळ टिकत नाहीत, त्यामुळे नोटा बनवण्यासाठी आरबीआय कापूस वापरते. नोट्स बनवताना एकही कागद वापरला जात नाही.
8 / 8
नोटा बनवण्यासाठी 100 टक्के कापूस वापरला जातो. कापसाच्या नोटा कागदी नोटांपेक्षा मजबूत असतात. केवळ भारतातच नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये नोटा तयार करण्यासाठी कापसाचा वापर केला जातो. कापसाव्यतिरिक्त, अडेसिव सोल्युशन आणि गॅटलिनचा वापर केला जातो. त्यामुळे नोटा लवकर खराब न होता फार काळ टिकतात.
टॅग्स :Indiaभारत