शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्टॉक ब्रोकर ते रिटेल किंग; उभारली 2.26 लाख कोटींची कंपनी, एक रुपयाही कर्ज नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 2:12 PM

1 / 9
Radhakishan Damani: राधाकिशन दमानी(Radhakishan Damani) यांची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. राधाकिशन दमानी भारतातील आघाडीचे उद्योगपती आणि गुंतवणूकदार असून, फोर्ब्सच्या 2023 च्या सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत 8 व्या क्रमांकावर आहेत. त्यांची यशोगाथा दलाल स्ट्रीटमधून सुरू होऊन सर्वोच्च शिखरावर पोहोचते. 1980-90 च्या दशकात भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदार म्हणून ठसा उमटवणाऱ्या दमानी यांनी 2002 मध्ये रिटेल स्टोअर डी-मार्ट (D-Mart) सुरू केले. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये दमानी यांनी Dmart द्वारे 1492 रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
2 / 9
Dmart चे मार्केट कॅप आज 2,26,640 कोटी रुपये आहे. मात्र या व्यवसायात येण्यापूर्वी दमाणी हे स्टॉक ब्रोकर होते. राधाकिशन दमानी यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात स्टॉक ब्रोकर म्हणून केली होती, पण लवकरच त्यांना समजले की, जर त्यांना बाजारातून पैसे कमवायचे असतील तर त्यांना या व्यवसायात उतरावे लागेल. त्यानंतर लगेचच त्यांनी भारतीय शेअर बाजारात शेअर ट्रेडिंग सुरू केले. स्टॉक ट्रेडिंगमधून त्यांनी प्रचंड नफा कमावला. बाजारातील विविध चढ-उतारांचा वापर करून नफा कमविण्यावर त्यांचा विश्वास होता.
3 / 9
दलाल स्ट्रीटमध्ये संमिश्र यश अनुभवल्यानंतर 2001 मध्ये ते शेअर बाजारापासून दूर गेले आणि रिटेल उद्योगात प्रवेश केला. त्यांनी डीमार्ट सुपरमार्केट आणि हायपरमार्केट साखळी सुरू केली. DMart ही एक सुपरमार्केट आणि हायपरमार्केट साखळी आहे, जी प्रथम पवई, मुंबई येथे सुरू झाली. आज ती देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असून, डीमार्टचे देशभरात 300 हून अधिक स्टोअर्स आहेत.
4 / 9
डीमार्टची खास गोष्ट म्हणजे त्यांच्या स्टोअरमध्ये वर्षभर ऑफर्स असतात. परंतु असे असूनही कंपनी मजबूत नफा कमावते. राधाकिशन दमानी यांची एक कल्पना यामागे काम करते. कंपनीने कधीही भाड्याने डीमार्ट स्टोअर उघडले नाही. याशिवाय त्यांच्या स्टोअरमध्ये अत्यंत मर्यादित ब्रँडची उत्पादने उपलब्ध आहेत. कमी ब्रँडमुळे ग्राहक गोंधळून जात नाहीत, असा कंपनीचा विश्वास आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात Dmart ची विक्री 30,976 हजार कोटी रुपये होती.
5 / 9
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डीमार्ट ही आता कर्जमुक्त कंपनी बनली आहे. यामागे राधाकिशन दमानी यांच्या रणनीतीचा महत्त्वाचा वाटा आहे. कंपनीने 2015 ते 2019 दरम्यान कर्ज मिटवण्याची योजना आखली आणि 2021 मध्ये तिला यश मिळाले. आर्थिक वर्ष 2021 मध्ये कंपनीवरील कर्ज शून्यावर आले. नेहमी पांढरे कपडे परिधान करणे, ग्लॅमरपासून दूर राहणे हे अब्जाधीश गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.
6 / 9
दमाणी यांच्याकडे मोठे निर्णय आणि जोखीम घेण्यात नैपुण्य आहे. गेल्या दोन दशकांचा प्रवास सांगतो की, दमानी यांनी जोखीम पत्करली आणि त्यांचे नशीब बदलत राहिले. मार्च 2017 मध्ये एव्हेन्यू सुपरमार्केटच्या IPO नंतर दमाणी हे भारताचे रिटेल किंग म्हणून ओळखले जाऊ लागले. राधाकिशन दमानी यांची कंपनी एव्हेन्यू सुपरमार्केट 21 मार्च 2017 रोजी स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट झाली, त्यानंतर त्यांची संपत्ती अनेक श्रीमंत कुटुंबांपेक्षा जास्त झाली. डीमार्टचा शेअर 604.40 रुपयांवर सूचिबद्ध झाला, तर इश्यूची किंमत 299 रुपये ठेवण्यात आली.
7 / 9
फूड आणि किरकोळ किराणा विक्रेता डी-मार्ट ही भारतातील सर्वात फायदेशीर कंपन्यांपैकी एक आहे. राधाकिशन दमानी आणि त्यांच्या कुटुंबाचे एव्हेन्यू सुपरमार्ट्समध्ये 80 टक्के शेअर्स आहेत. 67 वर्षांचे राधाकिशन दमानी यांना लहानपणापासूनच अकाउंटिंगचा अभ्यास करण्याची आवड होती. म्हणूनच त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी मिळविण्यासाठी बॉम्बे विद्यापीठात प्रवेश घेतला. त्यांना तीन मुली आहेत. राकेश झुनझुनवाला, ज्यांना भारताचे वॉरेन बफे म्हटले जाते, तेही दमाणी यांना स्टॉक मार्केटमध्ये आपले गुरू मानत होते.
8 / 9
1954 मध्ये राजस्थानमधील बिकानेर येथील मारवाडी कुटुंबात जन्मलेल्या राधाकिशन दमाणी यांनी मुंबईतील एका खोलीच्या अपार्टमेंटमध्ये संपूर्ण कुटुंबासह राहत असताना शेअर बाजारात व्यापार करण्यास सुरुवात केली. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूकदार म्हणून करिअर करण्यासाठी त्यांनी कॉलेज सोडले आणि नंतर ते देशातील सर्वात मोठे गुंतवणूकदार म्हणून प्रसिद्ध झाले.
9 / 9
राधाकिशन दमानी त्यांच्या ब्राइट स्टार इन्व्हेस्टमेंट्स या गुंतवणूक फर्मद्वारे पोर्टफोलिओ व्यवस्थापन देखील करतात. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार राधाकिशन दमानी यांची एकूण संपत्ती $16.7 अब्ज आहे. अलीकडेच त्यांनी दक्षिण मुंबईतील मलबार हिल्स परिसरात 1,001 कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला आहे. देशातील सर्वात महागड्या बंगल्यांपैकी हा एक आहे.
टॅग्स :businessव्यवसायInvestmentगुंतवणूकshare marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजार