शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सुरू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहित D-Mart ला दुपटीपेक्षाही अधिक नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 1:27 PM

1 / 7
रिटेल सीरिज डीमार्टचं (D-Mart) संचालन करणारी कंपनी एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडनं शनिवारी सुरू आर्थिक वर्षात जून तिमाहीत एकूण निव्वळ नफा दुपटीपेक्षाही अधिक झाल्याची माहिती दिली.
2 / 7
गेल्या आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीच्या तुलनेत यावर्षी पहिल्या तिमाहित कंपनीला ९५.३६ कोटी रूपयांचा नफा झाला.
3 / 7
गेल्या वर्षी या आर्थिक वर्षात कंपनीला ४०.०८ कोटी रूपयांचा नफा झाला होता. त्यावेळी देशात कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर बाजारात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता.
4 / 7
एव्हेन्यू सुपरमार्ट्सनं मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार एप्रिल ते जून २०२१-२२ या तिमाहीत कंपनीचे ऑपरेटिंग उत्पन्न ५,१८३.१२ कोटी रुपये होते. तर मागील आर्थिक वर्षातील याच तिमाहीत ३,८८३.१८ कोटी रुपये होते.
5 / 7
कंपनीचा एकूण खर्च यादरम्यान ५,०७७.२२ कोटी रूपये इतका होता. जे एप्रिल-जून २०२०-२१ या तिमाहीमध्ये ३,८७५.१० कोटी रूपये होता.
6 / 7
एकल आधारावर कंपनीचं ऑपरेटिंग उत्पन्न जून तिमाहीदरम्यान ५,०३१.७५ कोटी रूपये होतं. जे या पूर्वीच्या आर्थित वर्षाच्या या तिमाहीत ३,८३३.२३ कोटी रूपये होते.
7 / 7
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत उत्पन्न ३१ टक्के वाढलं आहे. या दरम्यान निरनिराळ्या ठिकाणी लॉकडाऊनचा कालावधी निरनिराळा होता, असं कंपनीनं म्हटलं आहे.
टॅग्स :share marketशेअर बाजारMONEYपैसाcorona virusकोरोना वायरस बातम्या