शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नोकरीची चिंता सोडा अन् करा मोठी कमाई, प्रत्येक सीजनमध्ये हिट असणारा 'हा' खास व्यवसाय तुम्हाला बनवेल मालामाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 10:48 AM

1 / 10
देशात असे अनेक व्यवसाय आहेत, जे तुम्ही कमी खर्चात सुरू करू शकता आणि त्यातून भरपूर नफा कमवू शकता. असाच तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करीत असाल तर दुग्धजन्य पदार्थांचे काम तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
2 / 10
दुग्ध व्यवसाय (Dairy Products) हा एक व्यवसाय आहे, ज्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता फारच कमी असते. कोणताही सीजन किंवा परिस्थिती काहीही असो, दूध व दुधाच्या उत्पादनांची मागणी असते.
3 / 10
कमी गुंतवणूकीमध्ये तुम्ही या व्यवसायातून दरमहा चांगली कमाई करू शकता. यासाठी सरकारकडून कर्ज देते आणि सपोर्ट सुद्धा मिळतो. सरकारच्या मुद्रा लोन योजनेंतर्गत तुम्ही सहज व्यवसायासाठी कर्ज घेऊ शकता.
4 / 10
या व्यवसायासाठी सरकार आपल्याला पैशांसोबत या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती देते जेणेकरुन तुम्ही आरामात व्यवसाय सुरू करू शकता. डेअरी उत्पादनाच्या व्यवसायात तुम्ही फक्त 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतच दरमहा 70 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवू शकता.
5 / 10
दुग्धजन्य पदार्थांमध्ये तुम्ही विकू शकता अशा बर्‍याच गोष्टी आहेत. यामध्ये फ्लेवर दूध, दही, लोणी, तूप याशिवाय ताक, दूध विकू शकता. याचबरोबर, कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी, त्याची किंमत आणि मागणी याबद्दल रिसर्च केले पाहिजे.
6 / 10
जर तुम्हाला दूध किंवा दुधाच्या पदार्थांचे युनिट तयार करायचे असेल तर तुम्ही फ्लेवर दूध, दही, लोणी आणि तूप बनवून विक्री करू शकता. पंतप्रधान मुद्रा योजनेने तयार केलेल्या प्रोजेक्ट प्रोफाइलनुसार तुम्ही सुमारे 16 लाख रुपयांचा प्रकल्प तयार करू शकता.
7 / 10
प्रोजेक्ट प्रोफाइलनुसार, या व्यवसायाचा प्रोजेक्ट जवळपास 16 लाख 50 हजार रुपयांपर्यंत तयार केला जाऊ शकतो. मात्र, यामध्ये व्यक्तीला फक्त 5 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
8 / 10
जर पंतप्रधान मुद्रा योजनेच्या प्रोजेक्टनुसार, या व्यवसायात एका वर्षात 75 हजार लिटर फ्लेवर्ड मिल्कची विक्री होऊ शकते. याशिवाय, 36 हजार लिटर दही, 90 हजार लिटर लोणी आणि 4500 किलो तूपही विकले जाऊ शकते.
9 / 10
याचा जर हिशोब केला तर सुमारे 82 लाख 50 हजार रुपयांचा टर्नओव्हर होईल. ज्यामध्ये सुमारे 74 लाख रुपये खर्च येईल. यामध्ये 14 टक्के व्याज कपात करूनही तब्बल 8 लाखांची बचत होऊ शकते.
10 / 10
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 1000 चौरस फूट जागा आवश्यक आहे. ज्यामध्ये 500 चौरस फूट जागा काम करण्यासाठी, रेफ्रिजरेशन 150 चौरस फूट, वॉशिंग 150 चौरस फूट, ऑफिस, शौचालय आणि इतर सुविधांसाठी 100 चौरस फूट जागा आवश्यक आहे.
टॅग्स :milkदूधMilk Supplyदूध पुरवठा