शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

डॅनी डेन्जोंगपा, नाम तो सुना ही होगा...! स्वमालकीचा बिअर ब्रँड, भारतात तिसरा; मल्ल्याला केले चितपट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 5:10 PM

1 / 7
या पिळदार शरीरयष्टी असलेल्या बॉ़लिवूड कलाकाराला कोण ओळखणार नाही? तुम्ही याला कोणत्या नावाने ओळखता डॅनी डेन्जोंगपा की त्सेरिंग फिन्त्सो? दोन्ही नावे याच व्हिलनची आहेत. ज्याने स्वमालकीच्या बिअर ब्रँडद्वारे किंगफिशरच्या विजय मल्ल्यालाही चारीमुंड्या चित केले होते.
2 / 7
डॅनी हे केवळ बॉलिवुड हस्तीच नाहीत तर एक प्रसिद्ध उद्योगपती देखील आहेत. तुम्हाला कदाचित माहिती नसेल परंतू या कलाकाराचा स्वमालकीचा एक बिअर ब्रँडही आहे जो भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे. डॅनीने १९८७ ला सिक्कीममध्ये युक्सोम बेवरेजेस नावाची कंपनी सुरु केली होती.
3 / 7
२००५ मध्ये त्याने ओडिशामध्ये डेन्जोंग बेवरेजेस कंपनी सुरु करून बिअर बनविण्याच्या क्षेत्रात विस्तार केला. यानंतर डॅनीने चार वर्षांनी म्हणजेच २००९ मध्ये मल्ल्याचा डोळा असलेल्या आसामच्या ऱ्हिनो एजंन्सीज या दारु बनविणाऱ्या कंपनीची खरेदी केली आणि तीन कंपन्यांचा मालक बनला.
4 / 7
या तिन्ही मद्यनिर्मिती कंपन्यांची एकूण उत्पादन क्षमता वर्षाला 6.8 लाख हेक्टोलीटर एवढी प्रचंड आहे. युक्सोम ही पुर्वोत्तर राज्यांच्या अर्थव्यवस्थेला दरवर्षी १०० कोटी रुपयांचा महसूल देते. डॅन्सबर्ग आणि ही-मॅन ९००० सारखे ब्रँड याच कंपनीचे आहेत. युक्सोम ही भारताची तिसरी सर्वात मोठी बिअर उत्पादन करणारी कंपनी आहे.
5 / 7
माल्या पूर्वोत्तर बाजारात पाऊल ठेवण्याचा विचार करत होता. युबी ग्रुप केवळ दोन महिने जुनी असलेली ऱ्हिनोला खरेदी करणार होता. परंतु या भागात आपल्या व्यवसायाला युबी सुरुंग लावेल म्हणून डॅनीने हालचाल केली आणि ती कंपनीच विकत घेतली. या डीलने डॅनीने त्या बाजारात भक्कम पाय रोवले तसेच मल्ल्याच्या मनसुब्यांवरही पाणी फेरले.
6 / 7
डॅनीने 1971 मध्ये बीआर इशारा यांच्या 'जरूरत' चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. 1970 आणि 1980 च्या दशकात त्यांनी 'चोर मचाये शोर', 'कालीचरण', 'धर्मात्मा', 'द बर्निंग ट्रेन', 'लव्ह स्टोरी' आणि 'बुलंदी' यांसारख्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या.
7 / 7
कधी हिरो, कधी साईड हिरो तर कधी व्हिलन अशा भुमिकांनी डॅनीचा चेहरा भारतभर प्रसिद्ध झाला.
टॅग्स :Danny Denzopaडॅनी डेन्झोपा