Debit-credit card rules have changed by RBI; Know now not to get in trouble
डेबिट-क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये मोठे बदल; जाणून घ्या नाहीतर अडचणीत याल By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 6:38 PM1 / 8आरबीआयने डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे करण्यात येणारे व्यवहार आणखी सोपे आमि सुरक्षित केले आहेत. यासाठी दोन्ही प्रकारचे कार्ड ग्राहकांना देण्याच्या नियमांत मोठे बदल केले आहेत. 2 / 8बँकांना सांगण्यात आले आहे की, ग्राहकाला नवीन कार्ड देताना किंवा पुन्हा कार्ड देताना देशातील एटीएम आणि पीओएसवर वापरण्यासाठी केवळ डोमेस्टीक कार्डद्वारेच ट्रान्झेक्शनला मंजुरी द्यावी. यामुळे परदेशातून पैसे चोरी करण्याच्या प्रकारांना आळा बसणार आहे. 3 / 8जर ग्राहकाला परदेशातील व्यवहार, ऑनलाईन व्यवहार किंवा कॉन्टॅक्लेस व्यवहारांची सेवा हवी असेल तर त्याला ही सुविधा त्याच्या कार्डवर वेगळी घ्यावी लागेल. यामुळे सरसकट सर्व ग्राहकांना ही सुविधा देण्यात येणार नाही. 4 / 8ज्या ग्राहकांकडे अशाप्रकारची कार्ड आहेत त्यांनी त्यांच्या जबाबदारीवर ही सुविधा हवी की नको ते ठरवावे. जर तुम्हाला गरज वाटत नसेल तर तुम्ही आंतरराष्ट्रीय ट्रान्झेक्शनची सुविधा बंद करू शकता. पुन्हा हवी असेल तर ती घेऊ शकता. 5 / 8ज्या कार्डवर ही सुविधा दिलेली आहे, परंतू ती कधीच वापरली गेली नसेल तर बँकांना बंद करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. 6 / 8ग्राहक 24*7 कोणत्याही वेळी त्यांचे का़र्ड सुरू किंवा बंद करू शकणार आहेत. किंवा त्यांच्या ट्रान्झेक्शन लिमिटमध्ये बदल करू शकतात. यासाठी मोबाईल अॅप, इंटरनेट बँकिंग, एटीएमचा वापर करता येणार आहे. 7 / 8हे नवीन नियम 16 मार्चपासून लागू होणार आहेत. 8 / 8हे नवीन नियम प्रिपेड गिफ्ट कार्ड आणि मेट्रो कार्डवर लागू होणार नाहीत. आणखी वाचा Subscribe to Notifications