शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

डी-मॅट खाते : वापरच नसेल तर कशासाठी भरायचे चार्जेस? बंद करणेच हिताचे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2024 3:45 PM

1 / 5
तुम्ही जर शेअर बाजारामध्ये काही व्यवहार करत असाल तर तुमचे डी-मॅट खाते असणे आता सक्तीचे झाले आहे. अनेकांची एकापेक्षा अधिक डी-मॅट खाती असतात. जरी तुम्ही एखाद्या खात्यामध्ये व्यवहार केले नाहीत, तरी त्या खात्यासाठी असलेले देखभाल शुल्क (मेंटेनन्स चार्जेस) हे तुम्हाला भरावेच लागतात. त्यामुळे जर आपण एखादे डी-मॅट खाते वापरतच नसलो तर त्याचे देखभाल शुल्क भरण्यापेक्षा ते खाते बंद करणेच अधिक फायद्याचे असते. त्यामुळे हे खाते बंद करण्यासाठीची प्रक्रिया आपण बघुया.
2 / 5
सर्वांत प्रथम या खात्यामध्ये असलेल्या सर्व प्रकारच्या प्रतिभूती आपण एकतर विकून टाका किंवा अन्य खात्यामध्ये हस्तांतरित करा. त्याचप्रमाणे या खात्याचे काही देणे बाकी असेल तर ती रक्कम भरून टाका.
3 / 5
या खात्याची संपूर्ण माहिती घेऊन आपल्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटशी संपर्क साधा आणि त्याच्याकडे तुमचे खाते बंद करण्यासाठीचा पूर्ण भरलेला अर्ज सादर करा. अर्जामध्ये खाते बंद करण्याचे कारण द्या. यासोबतच आपली आवश्यक ती कागदपत्रे (पॅनकार्ड, ओळख आणि पत्त्याचा पुरावा) जमा करा.
4 / 5
जर या खात्यासाठीची काही रक्कम भरणे बाकी असेल तर ती सर्व रक्कम खाते बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वीच चुकती करा. या खात्याची कोणतीही बाकी तुमच्याकडे राहिलेली असेल तर खाते बंद होऊ शकणार नाही.
5 / 5
आपला अर्ज आणि कागदपत्रे मिळाली की, डीपीद्वारे ती कागदपत्रे तपासून ती योग्य असल्याची खात्री केली जाईल. यानंतर खाते बंद करण्याची प्रक्रिया राबवली जाईल. खाते बंद झाल्यावर त्याबाबतची सूचना पत्र वा ई-मेलद्वारे दिली जाईल. अशाप्रकारे न वापरते खाते बंद करून आपण देखभाल शुल्काचे पैसे वाचवू शकतो.
टॅग्स :share marketशेअर बाजारbusinessव्यवसायbankबँक