शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Post Office: पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये महिन्याला जमा करा १० हजार, १० वर्षांत मिळतील १६ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 5:17 PM

1 / 7
बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि यापैकी अनेक योजनांवर मिळणारा परतावा अतिशय आकर्षक आहे. यापैकी काही योजनांमध्ये जोखीम देखील समाविष्ट आहे. बहुतेक लोक अशा गुंतवणुकीला प्राधान्य देतात ज्यात कमी जोखीम असते, ज्यात त्यांची गुंतवणूक सुरक्षित असते.
2 / 7
बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि यापैकी अनेक योजनांवर मिळणारा परतावा अतिशय आकर्षक आहे. यापैकी काही योजनांमध्ये जोखीम देखील समाविष्ट आहे. बहुतेक लोक अशा गुंतवणुकीला प्राधान्य देतात ज्यात कमी जोखीम असते, ज्यात त्यांची गुंतवणूक सुरक्षित असते.
3 / 7
जर तुम्ही कमी जोखीम परतावा किंवा गुंतवणुकीचे पर्याय शोधत असाल तर ही पोस्ट ऑफिस योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतात. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिटमध्ये (Post Office Recurring Deposit) तुम्ही कमी जोखीम घेऊन स्वतःसाठी मोठा फंड तयार करू शकता.
4 / 7
पोस्ट ऑफिस आरडी डिपॉझिट खात्यात केवळ 100 रुपयांच्या छोट्या रकमेसह गुंतवणूक सुरू करू शकतात. यामध्ये कमाल मर्यादा नाही. ही योजना सरकारच्या हमी योजनेसह येते. रिकरिंग डिपॉझिट तुमच्या सोयीनुसार 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षांसाठी उघडता येते. त्यात जमा केलेल्या पैशावर तिमाही व्याज देण्यात येते. प्रत्येक तिमाहीच्या शेवटी व्याज (कपांऊंड इंटरेस्टसह) तुमच्या खात्यात जमा केले जाते.
5 / 7
सध्या, रिकरिंग डिपॉझिट स्कीमवर 5.8 टक्के व्याज देण्यात येत आहे. हा नवीन दर 1 एप्रिल 2020 पासून लागू करण्यात आला आहे. केंद्र सरकार प्रत्येक तिमाहीत आपल्या सर्व लहान बचत योजनांचे व्याजदर निश्चित करते. मात्र, ते गेल्या काही काळापासून याच दरांवर उपलब्ध आहे.
6 / 7
तुम्ही या योजनेत दरमहा 10,000 रुपये गुंतवल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी 16.28 लाख रुपये मिळतील. म्हणजेच तुम्ही स्वत:साठी मोठा निधी तयार करू शकता. तुम्हाला 10 वर्षांसाठी 10,000 रुपये जमा करावे लागतील आणि नंतर मॅच्युरिटीवर 16.28 लाख रुपये मिळतील.
7 / 7
कोणतीही व्यक्ती पोस्ट ऑफिस किंवा घराजवळील कोणत्याही शाखेत जाऊन हे खाते उघडू शकते. रोख किंवा चेकद्वारे पैसे जमा करून खाते उघडता येते. या स्कीममध्ये तुम्हाला दर महिन्याला पैसे जमा करावे लागतील. कोणत्याही महिन्यात पैसे जमा न केल्यास 1 टक्के दंड भरावा लागेल.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसInvestmentगुंतवणूकMONEYपैसा