शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिवाळीची शॉपिंग करताय? 'या' क्रेडिट कार्ड्सवर मिळतेय बंपर ऑफर्स आणि कॅशबॅक...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 6:43 PM

1 / 8
दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशा परिस्थितीत लोकांनी दिवाळीची खरेदी सुरू केली आहे. दरम्यान, तुम्हीही दिवाळीत तुमचे कोणतेही आवडते गॅजेट्स किंवा कपडे खरेदी करण्याचा विचार करत असाल तर क्रेडिट कार्डने खरेदी करून तुम्ही खूप मोठी बचत करू शकता. कारण, वेगवेगळ्या बँकांचे क्रेडिट कार्ड ग्राहकांना चांगल्या ऑफर आणि कॅशबॅक देत आहेत. अशाच काही क्रेडिट कार्डांबद्दल जाणून घ्या...
2 / 8
या क्रेडिट कार्डची वार्षिक फी १००० रुपये आहे. या क्रेडिट कार्डद्वारे तुम्हाला Amazon, Cult.fit, Book My Show, Sony Liv, Flipkart, Myntra, Swiggy, Tata Click, Zomato आणि Uber वर ५ टक्के कॅशबॅक मिळू शकते. इतर खर्चांवर १ टक्के कॅशबॅक मिळत आहे. एका तिमाहीत एक लाख रुपये खर्च केल्यास तुम्हाला एक हजार रुपयांचे गिफ्ट व्हाउचर किंवा १ डोमेस्टिक लाउंज ऍक्सेस देखील मिळेल. ज्वाईंनिग आणि रिन्यूअल फी भरण्यासाठी १००० कॅशपॉइंट देखील मिळत आहेत.
3 / 8
या क्रेडिट कार्डची वार्षिक फी ९०० रुपये आहे. या कार्डवर ऑनलाइन खरेदी केल्यास ५ टक्के कॅशबॅक मिळत आहे. ऑफलाइन खरेदीवर १ टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. तसेच, भारतातील सर्व पेट्रोल पंपावर १ टक्के फ्यूल सरचार्ज डिस्काउंट मिळत आहे.
4 / 8
या क्रेडिट कार्डवर वार्षिक फी ४९९ रुपये आहे. या कार्डच्या माध्यमातून गुगल पेद्वारे बिल पेमेंट आणि रिचार्ज केल्यास ५ टक्के कॅशबॅक मिळत आहे. Swiggy, Zomato आणि Ola वर ४ टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. इतर खर्चांवर १.५ टक्के कॅशबॅक मिळत आहे. तुम्ही मागील ३ महिन्यांत ५० हजार खर्च केल्यास वर्षभरात ४ डेस्टिनेशन लाउंज व्हिजीट फ्री आहे.
5 / 8
या क्रेडिट कार्डसाठी कोणतेही वार्षिक शुल्क नाही. यामध्ये प्राइम सदस्यांसाठी Amazon वर ५ टक्के कॅशबॅक मिळत आहे. नॉन-प्राइम सदस्यांसाठी Amazon वर ३ टक्के कॅशबॅक आहे. Amazon Pay मर्चेंट्सकडून पेमेंटवर २ टक्के कॅशबॅक आहे. इतर खर्चांवर १ टक्के कॅशबॅक मिळत आहे. तसेच ३ महिने मोफत Amazon प्राइम मेंबरशिप मिळत आहे. याशिवाय, दोन हजार रुपयांचे अॅक्टिव्हेशन बेनिफिट्स मिळत आहेत.
6 / 8
या क्रेडिट कार्डची वार्षिक फी ४९९ आहे. तसेच, हे क्रेडिट कार्ड पहिल्या वर्षासाठी मोफत आहे. येथे तुम्हाला सर्व ऑनलाइन खरेदीवर ३ टक्के कॅशबॅक पॉइंट (प्रत्येक २०० रुपयांवर ६ पॉइंट) मिळत आहेत. इतर खर्चांवर १.५ टक्के कॅशबॅक पॉइंट्स (प्रत्येक २०० रुपयांवर ३ पॉइंट) उपलब्ध आहेत. १ कॅशबॅक पॉइंट १ रुपये आहे. सर्व पेट्रोल पंपांवर १ टक्के फ्यूल सरचार्ज सूट आहे. तुम्ही एका वर्षात १.२ लाख किंवा त्याहून अधिक किमतीची खरेदी केल्यास वार्षिक फी आकारली जात नाही.
7 / 8
कोटक क्रेडिट कार्डची वार्षिक फी ५०० रुपये आहे. Myntra कडून खरेदीवर कमाल ७.५ टक्के सूट मिळत आहे. Swiggy, Swiggy Instamart, PVR, Cleartrip आणि Urban Company वर ५ टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. इतर खर्चांवर अनलिमिटेड १.२५ टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. तसेच, मोफत Myntra Insider मेंबरशिप मिळत आहे. कार्ड जारी केल्याच्या ३० दिवसांच्या आत किमान ५०० चा पहिला व्यवहार पूर्ण केल्यावर ५०० रुपये किमतीचे Myntra व्हाउचर मिळत आहे. एका तिमाहीत ५०,००० रुपये खर्च केल्यानंतर प्रत्येक तिमाहीत २ विनामूल्य PVR तिकिटे मिळत आहे.
8 / 8
ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डसाठी वार्षिक फी ५०० रुपये आहे. या कार्डवर Flipkart आणि Cleartrip वर खरेदी केल्यास ५ टक्के कॅशबॅक मिळत आहे. Cult.fit, PVR, Swiggy आणि Uber वर ४ टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. इतर खर्चांवर १ टक्के कॅशबॅक मिळत आहे. वेलकम बेनिफिट्समध्ये ५०० रुपयांचे Flipkart व्हाउचर आणि पहिल्या Swiggy ऑर्डरवर १०० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे.
टॅग्स :businessव्यवसायDiwaliदिवाळी 2024bankबँकShoppingखरेदीonlineऑनलाइन