शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Post Office च्या ‘या’ स्कीम्समधून मॅच्युरिटीपूर्वी काढू नका पैसा, अन्यथा द्यावा लागेल ‘इतका’ दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 9:40 AM

1 / 8
Post Office Scheme Penalty : देशातील बहुतांश लोक बँकेपेक्षा पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. कारण पोस्ट ऑफिसमध्ये लोकांना बँकेपेक्षा जास्त व्याज मिळते. यासोबत पोस्ट ऑफिसची गुंतवणूक सुरक्षित असते आणि खात्रीशीर परतावा देते.
2 / 8
पोस्ट ऑफिसमध्ये सर्वसामान्य नागरिकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध योजना राबवल्या जातात. अशा परिस्थितीत, सर्व योजना अशा आहेत की त्या 5 वर्षांत मॅच्युअर होतात. जर तुम्हाला त्यांच्या मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढायचे असतील, तर तुम्हाला दंडाच्या स्वरूपात काही नुकसान सहन करावे लागेल.
3 / 8
पोस्ट ऑफिस मंथली सेव्हिंग स्कीम - Post Office MIS म्हणजे Monthly Income Scheme मध्ये, तुम्हाला 5 वर्षांसाठी एकरकमी रक्कम जमा करावी लागेल. याद्वारे, तुम्हाला उत्पन्न म्हणून 5 वर्षांसाठी दरमहा एक निश्चित रक्कम मिळू शकते. 5 वर्षानंतर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतात. पण जर तुम्हाला 5 वर्षापूर्वी पैशांची गरज असेल तर तुम्हाला दंड भरावा लागेल.
4 / 8
जर तुम्ही एक वर्ष ते तीन वर्षांच्या दरम्यान पैसे काढले तर डिपॉझिट रकमेपैकी 2 टक्के कपात केली जाईल आणि परत केली जाईल. दुसरीकडे, जर खाते तीन वर्षांपेक्षा जुने असेल परंतु तुम्हाला 5 वर्षापूर्वी पैसे काढायचे असतील, तर जमा केलेल्या रकमेतून 1 टक्के रक्कम वजा केल्यावर, डिपॉझिट रक्कम तुम्हाला परत केली जाईल.
5 / 8
रिकरिंग डिपॉझिट - पोस्ट ऑफिस रिकरिंग खाते देखील 5 वर्षांसाठी असते. रिकरिंग डिपॉझिट खात्यातील गुंतवणूकदारांना 3 वर्षांनंतर पैसे काढण्याची सुविधा मिळते. मुदतपूर्व पैसे काढल्यावर, तुम्हाला फक्त बचत खात्यानुसार व्याजदराचा लाभ मिळेल.
6 / 8
सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीम - या पोस्ट ऑफिस स्कीममध्येही तुम्हाला 5 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. खाते उघडल्याच्या तारखेपासून 5 वर्षांनी ते मॅच्युअर होते. मात्र पाच वर्षापूर्वी त्यातून पैसे काढायचे असतील तर दंड भरावा लागतो. यामध्ये, 2 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी पैसे काढण्यासाठी डिपॉझिट रकमेतील 1.5 टक्के रक्कम वजा केली जाते आणि 2 वर्षानंतर पैसे काढल्यास 1 टक्के रक्कम दंड म्हणून कापली जाते.
7 / 8
पीपीएफ स्कीम - ही स्कीम 15 वर्षांची आहे, परंतु तिचा लॉक इन कालावधी 5 वर्षांचा आहे. 5 वर्षांनंतर तुम्ही काही अटींसह पैसे काढू शकता आणि खाते बंद करू शकता. परंतु खाते उघडण्याच्या तारखेपासून ते बंद होण्याच्या तारखेपर्यंत 1 टक्के व्याज कापले जाते.
8 / 8
किसान विकास पत्र - 124 महिन्यांत गुंतवणूक दुप्पट करणाऱ्या या योजनेचा 30 महिन्यांचा लॉक-इन कालावधी आहे. या योजनेत तुम्ही 1 वर्षापूर्वी पैसे काढल्यास त्यावर कोणतेही व्याज मिळणार नाही. या योजनेनुसार गुंतवणूकदाराला पैसे काढण्यासाठी दंडही भरावा लागेल. 1 वर्ष ते 2.5 वर्षांच्या दरम्यान पैसे काढल्यावर व्याज मिळेल, परंतु रक्कम कमी मिळेल. 2.5 वर्षांनंतर ही स्कीम बंद केल्यास आणि पैसे काढल्यास कोणताही दंड आकारला जाणार नाही. तसंच त्या वेळी असलेल्या व्याज दरानुसार परतावा दिला जाईल.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसMONEYपैसाInvestmentगुंतवणूक