Do you also scan QR code for online payment Know these important things
ऑनलाइन पेमेंटसाठी तुम्हीही QR Code स्कॅन करता? मग ही माहिती वाचा, नाहीतर खातं होईल रिकामं! By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2021 3:16 PM1 / 9झटपट पेमेंट करण्यासाठी सध्या QR Code स्कॅनच्या माध्यमातून पेमेंट करणं खूप सोपं झालं आहे. त्यामुळे याचा वापरही वाढला आहे. डिजिटल पेमेंटमुळे चांगल्या सुविधा प्राप्त होत असल्या तरी त्यात धोका देखील तितकाच वाढू लागला आहे. 2 / 9सध्या बहुतांश लोक वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी डिजिटल पेमेंटचा मार्ग स्वीकारतात. ज्यात कोणत्याही ठिकाणी पेमेंट करण्यासाठी QR Code स्कॅन करुन डिजिटल पद्धतीनं पैसे अदा करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. याचाच आता गैरफायदा देखील घेतला जाऊ लागला आहे. 3 / 9सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून ऑनलाइन पेमेंटच्या बाबतीतील फ्रॉडमध्ये वाढ झाली आहे. या कामात तरबेज असणारे हॅकर अगदी काही मिनिटांत तुमचं बँक खातं रिकामी करू शकतात. त्यामुळे डिजिटल पेमेंट करताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेच आहे. 4 / 9QR Code स्कॅन करुन व्यवहार करण्याचा पर्याय सोपा असला तरी फक्त पेमेंट करण्यासाठी म्हणजे पैसे अदा करण्यासाठीच QR Code स्कॅनचा वापर करावा. पैसे स्वीकारण्यासाठी करू नये असं तज्ज्ञ सांगतात. कारण जेव्हा पैसे देण्यासाठी तुम्ही एखादा QR Code स्कॅन करता तेव्हा तुम्ही केलेल्या पेमेंटचा मेसेज तुम्हाला येतो. तुमच्या खात्यातून वजा झालेल्या रकमेची माहिती तुम्हाला मिळते. पण पैसे स्वीकारण्यासाठी कोणत्याही स्कॅनची गरज नसते ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. 5 / 9एखादा व्यक्ती तुम्हाला पैसे स्वीकारण्यासाठी एखादा QR Code स्कॅन करायला सांगत असेल तर तसं अजिबात करू नका. यामागे काहीतरी फ्रॉड दडलेलं असू शकतं. 6 / 9सध्या शॉपिंगवेळी, भाजीच्या दुकानात किंवा मग कोणत्याही दुकानात रोख पैसे अदा करण्याऐवजी QR Code स्कॅनच्या माध्यमातून पेमेंट करणं अधिक पसंत करू लागलो आहोत. QR Code एक युनिक आयडेंटिफिकेशन कोड असल्यानं तो हॅक करणं कठीण काम आहे. पण असं असलं तरी काही महाठग चुकीच्या पद्धतीनं सूचना देऊन काहीतरी नव्या पर्यायानं फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. यापासून सावध राहणं गरजेचं आहे. 7 / 9सायबर गुन्हेगार क्यूआर कोडबाबत तुमच्या नजरेआड बदलू शकतात किंवा तुमचं लक्ष विचलीत करुन काहीतरी फेरफार करण्याचा प्रयत करू शकतात. त्यामुळे कोड स्कॅन केल्यानंतर ज्या व्यक्तीला पेमेंट करणार आहोत त्याच्याशी संबंधित क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर आपण कोणत्या नावावर पेमेंट करत आहोत त्याची माहिती दाखवली जाते. त्याची खातरजमा करुनच पिनकोड टाकावा. 8 / 9पिनकोड टाकण्याआधी संबंधित खातेधारकाच्या नावाची पडताळणी करुनच पेमेंट करावं. कोणतीही घाईगडबड करू नये. याशिवाय अनेकदा लिंकवर क्लिक केल्यानंतर QR Code येईल असं सांगितलं जाऊन लिंकवर क्लिक करण्यास भाग पाडलं जातं. असं अजिबात करू नका. एखाद्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या खात्याची माहिती चोरली जाऊ शकते. 9 / 9चुकीच्या पद्धतीनं पेमेंट झालं आणि पैसे अकाऊंटमधून वळवले गेल्याचा मेसेज आल्यानं लोक घाबरतात. त्यानंतर पैसे परत अकाऊंटमध्ये हवे असतील तर पुन्हा एकदा स्कॅन करण्याचा सल्ला दिला जातो. पण असं करणंही आवर्जुन टाळावं. कारण तुम्हाला आलेल्या मेसेजची आधी व्यवस्थित पडताळणी करुन पाहावी. तुमच्या खात्यातून पैसे कट झाल्याचा मेसेज फेक असू शकतो आणि तुमच्या परिस्थितीचा फायदा घेऊन धोका दिला जाऊ शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications