Do you have to pay tax if you keep gold at home? Find out what the rules say
घरात सोनं ठेवलं तर टॅक्स भरावा लागतो का? नियम काय सांगतो जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 4:21 PM1 / 7Gold Silver : आपल्या देशात सोनं-चांदी खरेदी करण्याची मोठी परंपरा आहे. भारतात सोने खरेदी करणे गुंतवणुकीसाठी खूप लोकप्रिय आहे तसेच शुभही आहे. लग्न, वाढदिवस किंवा कोणत्याही मोठ्या सणाला भेट म्हणून आपल्याकडे सोनं दिल जाते.2 / 7सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तर दुसरीकडे आपल्याकडे चोऱ्याही होतात. यामुळे अनेकजण ते सुरक्षित ठेवण्यासाठी बँक लॉकर वापरतात.3 / 7पण, बरेच लोक ते फक्त घरी ठेवतात. घरात किती सोने ठेवता येईल याबाबतच्या नियमांबाबत अनेकांना अजूनही माहिती नाही. मर्यादेपेक्षा जास्त सोने घरात ठेवल्यास त्याचा हिशोब द्यावा लागतो.4 / 7सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसच्या नियमांनुसार घरात मर्यादेपेक्षा जास्त सोने असल्यास त्याची माहिती आयकर विभागाला द्यावी लागते. 5 / 7त्याचबरोबर घरात ठेवलेल्या सोन्याचाही पुरावा असावा. पुरावा म्हणून, सोने कोठून खरेदी केले किंवा ते कोणी भेट दिले. हे सर्व द्यावे लागते.6 / 7सीबीडीटीच्या परिपत्रकानुसार सोन्याचे किंवा सोन्याचे दागिने वारसाहक्काने मिळाल्यास कोणताही कर भरावा लागणार नाही. पण, वारसाहक्काने मिळालेले सोन्याचे दागिने विकल्यास कर भरावा लागतो.7 / 7जर एखाद्या व्यक्तीने कोणतेही सोन्याचे दागिने खरेदी केले आणि तीन वर्षांच्या आत विकले तर त्याला अल्प-मुदतीचा भांडवली नफा कर भरावा लागेल. ३ वर्षांनंतर सोन्याच्या विक्रीवर दीर्घकालीन भांडवली लाभ कर भरावा लागतो. आणखी वाचा Subscribe to Notifications