Do you invest in mutual funds through SIP? Remember these five things
तुम्ही SIP'च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? 'या' पाच गोष्टी लक्षात ठेवा By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 3:16 PM1 / 9SIP : सध्याच्या काळात गुंतवणूक महत्वाची आहे, अनेकजण गुंतवणुकीसाठी शेअर मार्केट म्युच्युअल फंड यासारख्या पर्यायांचा वापर करतो. गेल्या काही वर्षांत, सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. 2 / 9एसआयपीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या शहरासह खेड्यातील लोकांचीही मोठ्या प्रमाणात आहे. यापूर्वी आपल्याकडे बचत किंवा सेवानिवृत्तीसाठी बँक एफडी किंवा पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक करत होते.3 / 9आता या पर्यायांपेक्षा SIP मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पण काही छोट्या कारणामुळे आपल्याला मोठा परतावा मिळत नाही. एसआयपी मध्ये गुंतवणूक करत असताना आपल्या महत्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते.4 / 9गेल्या काही काळापासून शेअर बाजारात कमालीची वाढ झाली आहे. यामध्ये बहुतांश शेअर्सनी उत्कृष्ट परतावा दिला आहे. पण, शेअर बाजार आपल्याला नेहमी चांगला परतावा देईल असं होतं नाही.5 / 9बाजारात तेजी आल्यानंतर कधी कधी मंदीही येत असतेच.त्यावेळी शेअर्समध्ये मोठी घसरण होते. अशा चढउतारांचा अंदाज बांधणे आणि त्यावर आधारित गुंतवणुकीचे निर्णय घेणे सामान्य गुंतवणूकदाराला खूप अवघड असते. यामुळे SIP हा सर्वोत्तम पर्याय आहे.6 / 9एसआयपी केल्याने तुम्हाला चक्रवाढीचा लाभ मिळतो. तुमच्या गुंतवणुकीतून तुम्हाला मिळणारा अतिरिक्त पैसाही गुंतवला जातो आणि यामुळे तुम्हाला दीर्घकाळात मजबूत परतावा मिळतो. एसआयपीमध्ये तुम्हाला सरासरीचा फायदा देखील मिळतो. उदाहरणार्थ, SIP मध्ये फंड हाऊसने महागड्या किमतीत शेअर खरेदी केला. जेव्हा बाजार घसरतो तेव्हा तोच शेअरही स्वस्त होईल. 7 / 9 तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार SIP ची रक्कम ठरवा. जर तुमची अचानक आर्थिक परिस्थीती बिघडली तरीही तुम्ही तुमची SIP सुरू ठेवू शकाल, अशी रक्कम ठरवा. एसपीची तुलना शॉर्ट टर्मवर करु नका. एसआयपी नेहमी दीर्घ मुदतीत चांगला परतावा देते, म्हणून त्याच प्रकारे नियोजन करा.8 / 9तुम्ही एकापेक्षा जास्त SIP विचारात घ्या. फंडातील गुंतवणुकीत अधिक जोखीम असते. तुम्ही कर्ज, इक्विटी आणि इतर मालमत्ता वर्ग संतुलित करून गुंतवणूक करावी.एसआयपी करताना तुम्ही खर्चाचे प्रमाण तपासले पाहिजे. जर खर्चाचे प्रमाण जास्त असेल तर तुमचा परतावा कमी असू शकतो. 9 / 9तुमच्या SIP चे नियमितपणे समीक्षा करणे देखील महत्त्वाचे आहे. जर तुमचा फंड त्याच्या स्पर्धकांच्या आणि बाजाराच्या तुलनेत चांगली कामगिरी करत नसेल तर तुम्ही तो बदलण्याचाही विचार करा. आणखी वाचा Subscribe to Notifications