शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Post Office मधील PPF अकाऊंट तुम्हाला बँकेत ट्रान्सफर करायचाय? जाणून घ्या, संपूर्ण प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 11:38 AM

1 / 11
गेल्या अनेक दशकांपासून Post Office हे भारतीयांचे अढळ विश्वासाचे स्थान आहे. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आताच्या घडीला उपलब्ध असून, कोट्यवधी देशवासी नानाविध योजनांचा लाभ घेत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात पोस्ट ऑफिस अनेक प्रकारच्या सुविधा प्रदान करते. Post Office अजूनही गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो.
2 / 11
Post Office मध्ये तुमचे पैसेही सुरक्षित राहतात, यासोबतच तुम्हाला हमखास परतावाही मिळतो. पोस्ट ऑफिस योजनांव्यतिरिक्त पोस्ट ऑफिस विमा उत्पादने उपलब्ध करून देते. पोस्ट ऑफिसच्या काही खास योजना आहेत, या माध्यमातून तुम्हाला केवळ निश्चित उच्च परतावा मिळत नाही, तर या योजनांमधील गुंवतणुकीवर टॅक्सही लागत नाही.
3 / 11
Post Officeच्या अनेक योजना आहेत. या योजनांमध्ये केवळ उत्तम नफा आणि सुरक्षिततेचा पर्याय उपलब्ध नाही. पण इतरही अनेक सुविधा उपलब्ध आहेत. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आहेत, ज्या खूप प्रसिद्ध आहेत, या योजनांमध्ये रिटर्नच्या हमीसह, कर सूट देण्याची सुविधा उपलब्ध आहे.
4 / 11
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही सर्वोत्तम योजनांपैकी एक आहे. यामध्ये १५ वर्षांसाठी गुंतवणूक करणे हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. त्याचा व्याजदर ७.१ टक्के आहे. यावर करात सूटही मिळते.
5 / 11
पोस्ट ऑफिस आणि बँक या दोन्ही ठिकाणी तुम्ही PPF खाते उघडू शकता. तुम्ही PPF खाते एका बँकेतून दुसऱ्या बँकेत, बँकेतून पोस्ट ऑफिसमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमधून इतर कोणत्याही बँकेत ट्रान्सफर करू शकता. तुम्ही तुमचे पीपीएफ खाते पोस्ट ऑफिसमध्ये उघडले असेल आणि तुम्हाला ते बँकेत ट्रान्सफर करायचे असेल, तर नेमकी प्रोसेस काय? जाणून घ्या...
6 / 11
तुम्ही बँकेत PPF खाते उघडा किंवा पोस्ट ऑफिसमध्ये, त्यावर उपलब्ध सुविधा दोन्ही ठिकाणी सारख्याच आहेत. पण जर हे खाते त्या बँकेत असेल ज्यामध्ये तुमचे आधीच बचत खाते आहे, तर पीपीएफ खाते व्यवस्थापित करणे थोडे सोपे होते. या प्रकरणात, तुम्ही पीपीएफ खाते बँकेच्या ऑनलाइन सेवेशी, नेट बँकिंगशी लिंक करू शकता.
7 / 11
याशिवाय बँकेचे पासबुक ऑनलाइन ट्रॅक करण्यासोबतच तुम्ही सर्व काम ऑनलाइन करू शकता. दुसरीकडे, पोस्ट ऑफिसमध्ये तुमचे पीपीएफ खाते असल्यास, तुम्हाला सर्व कामांसाठी स्वत: तेथे जावे लागेल. सुरुवातीला पोस्ट ऑफिसमध्ये उघडलेले PPF खाते बँकेत ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सोपी आहे.
8 / 11
प्रथम बँकेची कोणती शाखा PPF ठेवी स्वीकारते, ते शोधा आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे पासबुक, KYC कागदपत्रांसह लेखी अर्ज किंवा खाते ट्रान्सफर फॉर्म पोस्ट ऑफिसमध्ये सबमिट करावे लागतील, जेथे तुमचे खाते उघडले आहे. या ट्रान्सफर फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचे खाते ट्रान्सफर करायचे असलेल्या बँकेच्या शाखेची संपूर्ण माहिती द्यावी लागेल.
9 / 11
कागदपत्रांच्या पडताळणीनंतर पोस्ट ऑफिस तुमचे PPF खाते बंद करेल. यानंतर, पोस्ट ऑफिस मूळ कागदपत्रांसह शिल्लक पे ऑर्डर थेट तुम्हाला ज्या बँकेत खाते हस्तांतरित करायचे आहे, खाते बंद होण्याच्या दिवसापर्यंत पाठवेल. तुमचे PPF खाते ट्रान्सफर झाल्याचे तुम्हाला कळवले जाईल.
10 / 11
यानंतर, बँकेत कागदपत्रे पोहोचल्यानंतर नवीन PPF खाते उघडण्यासाठी ग्राहकाला फॉर्म ए, नॉमिनेशन फॉर्म भरावा लागेल. यासोबतच मूळ पीपीएफ पासबुक आणि केवायसीची कागदपत्रेही द्यावी लागतील.
11 / 11
यानंतर, ग्राहकाला नवीन पासबुक जारी केले जाते. यात बॅलन्स ट्रान्सफरसारख्या जुन्या क्रेडिटचे तपशील आहेत. खाते हस्तांतरणाच्या प्रक्रियेस सुमारे एक आठवडा किंवा थोडा जास्त वेळ लागू शकतो. (टीप - यासंदर्भात तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसPPFपीपीएफbankबँक