शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ambani Family : अंबानी कुटुंबातील महिलांचं शिक्षण किती माहितीये का ? होणाऱ्या सूनेला आहे नृत्याची आवड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 5:16 PM

1 / 7
देशातील श्रीमंत कुटुंबांपैकी एक म्हणजे अंबानी कुटुंब. मुकेश अंबानी हे लोकप्रिय बिझिनेसमन आहेत. साहजिकच त्यांच्याबाबतची छोटी ते मोठी गोष्ट चर्चेतच असते.
2 / 7
नुकतेच मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाचा अनंत अंबानीचा साखरपुडा पार पडला. उद्योगपती विरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट लवकरच अंबानींची सून होणार आहे.
3 / 7
अंबानी परिवारातील महिला सुद्धा नेहमी तितक्याच प्रकाशझोतात असतात. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी असो, त्यांची मुलगी इशा अंबानी पिरामल असो, त्यांची मोठी सून श्लोका मेहता अंबानी असो आणि आता होणारी सून राधिका मर्चंट असो. अंबानी कुटुंबातील महिलांचे नक्की शिक्षण किती झाले आहे बघुया
4 / 7
नीता अंबानी या या ही वयात अगदी फिट आणि सुंदर दिसतात. अनेक महिला त्यांच्याकडून प्रेरणा घेतात. नीता अंबानी यांनी मुंबईच्या नरसी मोंजी कॉलेजमधून कॉमर्स अॅंड इकोनॉमिक्समध्ये पदवी घेतली आहे. तसेच त्या भरतनाट्यममध्ये पारंगत आहेत.
5 / 7
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिने अमेरिकेच्या येल युनिव्हर्सिटीमधून मानसशास्त्रात पदवी घेतली आहे. त्यानंतर तिने कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफोर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए केले आहे.
6 / 7
अंबानी कुटुंबातील थोरली सून आणि आकाश अंबानी यांची पत्नी श्लोका मेहता अंबानी हिने न्यूजर्सीच्या प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमधून एन्थ्रोपोलॉजीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. श्लोकाला सामाजिक कार्यात रस आहे.
7 / 7
अंबानी कुटुंबाची होणारी धाकटी सून राधिका मर्चंट हिने मुंबईतील इकोलो मोंडियल वर्ल्ड स्कूल आणि बीडी सोमानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. यानंतर तिने २०१७ मध्ये न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीतून समाजशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. तसेच तिने भरतनाट्यमचेही प्रशिक्षण घेतले आहे.
टॅग्स :Relianceरिलायन्सMukesh Ambaniमुकेश अंबानीFamilyपरिवारEducationशिक्षण