शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अंबानी कुटुंबीय १५००० कोटींच्या अँटिलियातील कोणत्या मजल्यावर राहतं माहितीये, कोणाला येण्याची परवानगी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 8:36 AM

1 / 7
अँटिलिया हे मुकेश अंबानी यांचं मायानगरी मुंबईतील खासगी निवासस्थान आहे. ही २७ मजली इमारत जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. ते २०१० मध्ये पूर्ण झाले. त्याची किंमत सुमारे १५ हजार कोटी रुपये आहे. या इमारतीच्या २७ व्या मजल्यावर अंबानी कुटुंबीय राहतात. नीता अंबानी यांच्या सांगण्यावरून हा निर्णय घेण्यात आलाय. अंबानी कुटुंबीयांच्या अगदी जवळचे लोकच या मजल्यावर पोहोचू शकतात.
2 / 7
अँटिलिया हे केवळ एक घर नाही तर एक उदाहरणदेखील आहे. आधुनिक लक्झरी आणि स्थापत्यकलेचा हा अतुलनीय नमुना आहे. अँटिलिया दक्षिण मुंबईत आहे, जो मुंबईतील सर्वात पॉश भागांपैकी एक मानला जातो. येथे अरबी समुद्र आणि शहराचे विहंगम दृश्य दिसतं. अँटिलिया ३७,००० चौरस मीटरमध्ये पसरलेला आहे. त्यात राहण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा आहेत.
3 / 7
अँटिलियामध्ये तीन हेलिपॅड आहेत जेथे हेलिकॉप्टर उतरू शकतात आणि उड्डाण करू शकतात. अनेक मजल्यांपर्यंत गाड्या पार्क करण्यासाठी जागा आहे. नऊ हाय स्पीड लिफ्टमुळे इमारतीच्या विविध भागात जाणं सोपं जातं. कामकाजासाठी स्वतंत्र खोल्याही बनल्या आहे, ज्या ठिकाणी कर्मचारीही राहतात.
4 / 7
मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी, मुलगा आकाश अंबानी, सून श्लोका मेहता आणि त्यांची मुलं पृथ्वी आणि वेदा आकाश अंबानी हे तिघेही अँटिलियाच्या २७ व्या मजल्यावर राहतात. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी देखील २७ व्या मजल्यावर राहतात. विशेष म्हणजे त्याखालील २५ मजले रिकामे आहेत.
5 / 7
प्रत्येक खोलीला चांगला प्रकाश आणि हवा मिळावी यासाठी नीता अंबानी यांनी २७ व्या मजल्यावर राहण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक खोलीत भरपूर प्रकाश आणि योग्य व्हेंटिलेशन असावं यासाठी त्यांनी हा मजला निवडण्यात आलाय. इमारतीच्या २७ व्या मजल्यावर फक्त जवळच्या लोकांनाच प्रवेश दिला जातो, असं म्हटलं जातं.
6 / 7
अँटिलियाच्या डिझाइनमध्ये विशेष काळजी घेण्यात आली आहे. येथे राहणाऱ्या लोकांना लक्झरी सोबतच आराम आणि विश्रांतीचा आनंद घेता येण्याची सोय आहे. अँटिलियाची निर्मिती अतिशय कमी वेळात झाली होती.
7 / 7
२००८ मध्ये त्याचं बांधकाम सुरू झालं आणि २०१० पर्यंत ते पूर्ण झालं. ही आश्चर्यकारक इमारत बांधण्यासाठी केवळ दोन वर्षे लागली. याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ८.० रिश्टर स्केलच्या भूकंपालाही ते तोंड देऊ शकते.
टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीnita ambaniनीता अंबानीbusinessव्यवसाय