शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोविड १९ मुळे काढायचीये PF खात्यातून रक्कम?; घरबसल्या होईल काम, पाहा प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 8:52 PM

1 / 9
सध्या देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. दरम्यान, या कालावधीत जर तुम्हाला उपचारासाठी किंवा अन्य कोणत्या कारणासाठी पैसे हवे असतील तर, पीएफ (Provident Fund) मधून ते काढणं शक्य आहे. पाहूया घरबसल्या तुम्ही कसे काढू शकाल पैसे.
2 / 9
सरकारच्या आकडेवारीनुसार, गेल्या लाटेच्या तुलनेत यावेळी कोरोनाच्या लाटेत मृत्यूदर कमी आहे. याशिवाय रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्यांची संख्याही तुलनेनं कमी आहे. परंतु या महासाथीचा अनेकांवर आर्थिक परिणामही झाला आहे. दरम्यान, हा आर्थिक तणाव कमी करण्यासाठी सरकारनं पीएफमधून निश्चित रक्कम काढण्यासाठी मंजुरी दिली आहे.
3 / 9
मार्च २०२० मध्ये, सरकारने महामारीच्या काळात रोखीच्या तुटवड्याचा सामना करणाऱ्या छोट्या व्यवसायांना दिलासा देण्याची घोषणा केली. EPF नियमांमधील दुरुस्तीनुसार, 'एक सदस्य तीन महिन्यांच्या मूळ वेतन आणि महागाई भत्ता (DA) किंवा खात्यातील शिल्लक ७५ टक्के रक्कम काढू शकतो.'
4 / 9
जे कर्मचारी EPF मध्ये योगदान देतात ते त्यांच्या EPF खात्यातून अॅडव्हान्स घेण्यासाठी अर्ज करू शकतात. पैसे काढण्यासाठी, कर्मचाऱ्याला EPFO नं जारी केलेला युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आवश्यक असेल आणि त्यांचे आधार, पॅन आणि बँक खाते त्यांच्या UAN शी लिंक केलेलं असणं आवश्यक आहे.
5 / 9
जर तुम्हाला पैसे काढायचे असतील तर तुम्हाला सर्वप्रथम ईपीएफओच्या साईटवर लॉग इन करावं लागेल, यानंतर 'Online Services' या टॅबमध्ये 'Claim (Form-31, 19 and 10C)' हा ऑप्शन निवडा.
6 / 9
यानंतर तुम्हाला तुमचं नाव, जन्मतारीख आणि आधारचे अखेरचे चार क्रमांक दिसतील. त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्याचे अखेरचे चार क्रमांक एन्टर करण्यास सांगितलं जाईल.
7 / 9
माहिती एन्टर केल्यानंतर तुम्ही दिलेली माहिती व्हेरिफाय करा. त्यानंतर तुम्हाला एक पॉप अप येईल. यामध्ये 'Certificate of undertaking' देण्यास सांगितलं जाईल.
8 / 9
एकदा व्हेरिफिकेशन झाल्यानंतर 'Proceed for' वर क्लिक करा. त्यानंतर ड्रॉप डाऊन मेन्यूमधून 'PF advance (Form 31)' सिलेक्ट करा. त्या ड्रॉप डाऊन मेन्यूमधून विड्रॉवलचं कारण म्हणून 'Outbreak of pandemic (COVID-19)' सिलेक्ट करा.
9 / 9
यानंतर तुम्हाला हवी असलेली रक्कम टाका. तसंच पत्ता आणि बँकेच्या चेकचं स्कॅन कॉपी द्या. यानंतर तुमच्या आधार अकाऊंटशी निगडीत एक ओटीपी येईल. ओटीपी भरुन तुमचा अर्ज सबमिट करा.
टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत