Does LIC have your money? Check with these tricks
LIC : 'एलआयसी'कडे तुमचे पैसे आहेत का? 'या' ट्रिक्सने तपासा By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 5:29 PM1 / 10आपल्याकडे गुंतवणुकीसाठी अनेक मार्गाचा वापर केला जातो. यात सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे एलआयसी आहे. एलआयसीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. पण अनेकजण यात गुंतवणूक मध्येच थांबवतात. यामुळे आपले पैसे अडकून पडतात, पण आपले किती पैसे अडकले आहेत हे तपासता येतं, यासाठी ट्रिक्स आहेत.2 / 10भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या खात्यात करोडो रुपये पडून आहेत ज्यावर कोणी दावा करत नाही.एखादा पॉलिसीधारक पैसे विसरतो अशा धारकांचे हे पैसे आहेत. काहीवेळा लोक दोन प्रीमियम भरल्यानंतर त्यांची पॉलिसी सोडतात. 3 / 10LIC प्रमाणे, देशात इतर अनेक खाजगी क्षेत्रातील कंपन्या आहेत ज्या लोकांना विमा देतात. LIC प्रमाणे त्यांच्या खात्यात कोट्यवधी रुपये पडून आहेत ज्यावर कोणी दावा करत नाही.4 / 10एलआयसीच्या खात्यात पडलेले पैसे मृत्यू दावा, मॅच्युरिटी क्लेम, सर्व्हायव्हल बेनिफिट्स, प्रीमियम रिफंड किंवा इन्डेम्निटी क्लेम या स्वरूपात जमा केले जातात, जे लोक विसरले आहेत. हे पैसे परत मिळण्यासाठी ठराविक कालावधी असतो त्यानंतर ती बेकायदेशीर मालमत्ता घोषित केली जाते. 5 / 10ही रक्कम हजारो कोटींच्या घरात आहे. जर तुमच्याकडेही LIC मध्ये पैसे जमा असतील किंवा जे तुम्ही काढू शकत नसाल तर ते जाणून घेण्याचा एक सोपा मार्ग आहे. ही पद्धत ऑनलाइन आहे ज्यामध्ये संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे.6 / 10तुमच्या पैशांची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला पॉलिसी क्रमांक, जन्मतारीख आणि पॅन कार्डची माहिती द्यावी लागेल. एलआयसी पृष्ठाच्या शीर्षस्थानी, एलआयसी पॉलिसी क्रमांकाचा एक ब्लॉक असेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा पॉलिसी क्रमांक भरावा लागेल.7 / 10यासाठी तुम्हाला एलआयसीच्या वेबसाइटवर जावे लागेल. तुम्हाला तुमच्या पैशांबद्दल माहिती हवी असलेल्या ठिकाणी तुम्ही थेट पोहोचू शकता. यासाठी तुम्ही https://licindia.in/Bottom-Links/Unclaimed-Policy-Dues वर क्लिक करा. 8 / 10येथे क्लिक केल्यास LIC चे एक पेज उघडेल. या पेजवर पॉलिसीधारकांना हक्क न मिळालेल्या आणि थकबाकीच्या रकमा असे लिहिले आहे.9 / 10तुमच्या पैशांची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला पॉलिसी क्रमांक, जन्मतारीख आणि पॅन कार्डची माहिती द्यावी लागेल. एलआयसी पेजच्या वरतीच, एलआयसी पॉलिसी क्रमांकासाठी एक ब्लॉक असेल, यामध्ये तुम्ही तुमचा पॉलिसी क्रमांक भरू शकता. 10 / 10त्याखाली पॉलिसीधारकाचे नाव विचारले जाते, यामध्ये तुम्हाला तेच नाव टाकावे लागेल जे पॉलिसी बनवताना टाकले होते. त्याच्या अगदी खाली, पॉलिसीधारकाची जन्मतारीख विचारली जाते ज्यामध्ये तुम्हाला अचूक जन्मतारीख आणि वर्ष द्यायचे असते. शेवटी तुम्हाला पॅनकार्ड क्रमांक द्यावा लागेल. त्यानंतर सबमिट बटण दाबा. यानंतर तुम्हाला तुमच्या जमा केलेल्या रकमेची संपूर्ण माहिती मिळेल. आणखी वाचा Subscribe to Notifications