शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Dolly Chaiwala Net Worth: परदेशीही आहेत डॉली चायवाल्याच्या चहाचे चाहते, सेलेब्सपेक्षा अधिक कमाई; नेटवर्थ जाणून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 11:15 AM

1 / 6
Dolly Chaiwala Net Worth: गेल्या काही दिवसांपासून डॉली चायवाला हा चर्चेचा विषय ठरत आहे. जेव्हा मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते, त्यावेळी बिल गेट्स यांनी भारत भेटीदरम्यान डॉली चायवालाच्या टपरीलाही भेट दिली होती.
2 / 6
डॉली चायवालाच्या टपरीवर बिल गेट्स चहा पितानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. नागपूरच्या रस्त्यावर चहा विकणाऱ्या डॉली चायवालाची अनोखी स्टाईल अनेकांना आवडते. नुकताच डॉली चायवाला मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावर चहा बनवता दिसला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय.
3 / 6
या व्हिडिओमध्ये तो समुद्र किनाऱ्यावर फिरणाऱ्या लोकांना चहा बनवून देताना दिसत आहे. डॉली चायवाला कमाईच्या बाबतीतही अनेक सेलिब्रिटींना मागे टाकत आहे. त्याची कमाईदेखील मोठी आहे. डॉली चायवालाच्या नेटवर्थबद्दल आज आपण जाणून घेऊ.
4 / 6
डॉली चायवाला गेल्या १६ वर्षांपासून नागपूरच्या सदर भागात चहाची टपरी चालवतो. त्याची चहा बनवण्याची स्टाईल लोकांना आवडते. बिल गेट्स त्याच्या टपरीवर चहा पिताना दिसल्यानंतर तो रातोरात स्टार बनला. यानंतर अनेक फूड व्लॉगर्सही त्या ठिकाणी आले आणि त्यांनी अनेक व्हिडीओ तयार केले. डॉली चायवाला दिवसाला ५०० कप चहा विकतो.
5 / 6
सोहेल खानसह अनेक स्टार्स त्याच्या दुकानात चहा प्यायलेत. डॉली चायवालाला आता स्पॉन्सर्सही मिळत आहे. त्याला प्रॉडक्ट प्रमोशनसाठीही बोलावलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चहा विकून तो दररोज साडेतीन ते चार हजार रुपये कमवतो. दर महिन्याला चहा विकून तो लाखो रुपये कमवतो.
6 / 6
डॉली चायवाला रोज सकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत चहाची विक्री करतो. एका कप चहाची किंमत ७ रुपयांपासून सुरू होते. याशिवाय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरूनही तो दरमहा हजारो रुपये कमवतोय. डॉली चायवालाची नेटवर्थ सुमारे १० लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.
टॅग्स :businessव्यवसायnagpurनागपूरBill Gatesबिल गेटस