Don't want a 9 to 5 job, then do 5 jobs at home; You will earn more than salary
९ ते ५ जॉब नकोय, मग घरबसल्या 'ही' ५ कामे करू शकता; सॅलरीपेक्षा कराल तगडी कमाई By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 4:10 PM1 / 12जर तुम्हाला सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत नोकरी करायची नसेल तर आजच्या काळात अनेक पर्याय आहेत. आजही अनेकजण नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करण्याला पसंती देतात. इतकेच नाही तर कोरोना काळात सुरु झालेला वर्क फ्रॉम होम आजही अनेक कंपन्यामध्ये लागू आहे. 2 / 12देशात बेरोजगारी एक मोठी समस्या आहे. प्रत्येक क्षेत्रात नोकऱ्यांची चणचण आहे. जर तुम्ही शिक्षित असाल आणि स्वत:च्या पायावर उभे राहायचे असेल तर असे अनेक छोटे उद्योग आहेत जे तुम्ही घरच्या घरी सुरू करू शकता. आज आम्ही तुम्हाला ५ असे बिझनेस सांगणार आहोत. जे सुरु करायला खूप पैसे नको केवळ तुमची मेहनत आणि जिद्दीवर व्यवसाय उभा राहू शकतो. 3 / 12जर तुम्ही शिक्षित असाल आणि एखाद्या खास विषयावर तुमची पकड असेल तर तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलांना शिकवू शकता. मागील काही वर्षापासून ऑनलाईन कोचिंग मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 4 / 12तुम्ही घरी बसल्या शेजारील मुलांना घरी बोलावून ट्यूशन देऊ शकता. जेव्हा मुले जास्त होतील तेव्हा तुम्ही स्वत:चे कोचिंग इंस्टिट्यूट खोलू शकता. जिथे तुम्ही विविध विषयांचे योग्य शिक्षक ठेऊन तुमचा व्यवसाय वाढवू शकता. नोकरीपेक्षा यातून उत्पन्न जास्त मिळेल त्याचसोबत तुम्ही रोजगार देणारेही बनाल. 5 / 12जर तुमच्याकडे एखाद्या विषयासंबंधी भरपूर ज्ञान असेल तर डिजिटल इंडियाच्या काळात तुम्ही कंटेट लिखाण करून पार्ट टाईम कमाई करू शकता. त्याचसोबत विविध विषयांवर व्हिडिओ बनवून ते युट्यूबवर अपलोड करू शकता. 6 / 12जर तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून प्रसिद्ध झाला. तर युट्यूब हादेखील तुमच्यासाठी कमाईचा पर्याय ठरू शकतो. बहुतांश लोकांना ब्लॉगिंगसाठी गुगल एडसेंसमधून जाहिरात पाहतात. एआयच्या माध्यमातून विस्तृत माहिती गोळा करून त्यावर व्हिडिओ बनवू शकता. सध्या युट्यूब व्हिडिओतून बरेच जण तगडी कमाई करत आहेत. 7 / 12फ्लिपकार्ट-अमेझॉनच्या ई कॉमर्स वेबसाईटवरून तुम्ही तुमचे प्रोडक्ट विकू शकता. त्यासाठी आधी तुम्हाला कोणत्या उत्पादनाची जास्त विक्री होते हे समजून घ्यावे लागेल. तुम्ही थेट होलसेलमधून माल आणून तो विक्री करून नफा कमावू शकता. 8 / 12तुम्हाला बिझनेस सुरू करण्यासाठी खर्च आणि विक्री याची तुलना करावी लागेल. त्यानंतर बचतीचा अनुमान लावून उद्योग करावा लागेल. तुम्ही तुमचा व्यवसाय हळूहळू वाढवू शकता. मोठ्या शहरात राहून तुम्ही सहजपणे ऑनलाईन मार्केटमधून माल विक्री करू शकता. 9 / 12आजच्या काळात सर्व मोठ्या कंपन्यांमध्ये नियुक्ती केवळ प्लेसमेंट एजन्सीद्वारे केली जाते. विशेषत: सुरक्षा रक्षक, सफाई कामगार, हेल्पर आणि सर्व प्रकारचे टेक्निकल लोक हे प्लेसमेंट एजन्सीद्वारेच ठेवले जातात. तुम्ही तुमच्या घरातील एका खोलीतून प्लेसमेंट एजन्सी सुरू करू शकता. 10 / 12या सेवेसाठी तुम्ही मोठ्या कंपन्यांशी टाय-अप करू शकता आणि तुमच्या एजन्सीद्वारे बेरोजगारांना रोजगार देऊ शकता. कोणताही खर्च न करता हा एक चांगला छोटा व्यवसाय आहे. आजच्या युगात प्रत्येक लहान-मोठ्या शहरात प्लेसमेंट एजन्सी आहेत. आयटी, फायनान्स, मार्केटिंग, एचआर, अकाउंट्स, लॉ, हेल्थकेअर, सोशल मीडिया या क्षेत्रातील जाणकार लोक स्वतःची कन्सल्टन्सी कंपनी उघडू शकतात.11 / 12जर तुम्ही हिंदीतून इंग्रजीत किंवा इंग्रजीतून हिंदीत भाषांतर करण्यात तज्ञ असाल तर तुम्ही घरबसल्या कमाई करू शकता. हा एक उत्तम पार्ट टाईम जॉब आहे. आजच्या युगात तुम्ही ऑनलाइन ट्रान्सलेटर बनून तुमच्या करिअरला नवा पर्याय देऊ शकता. 12 / 12सर्व संस्था पार्ट टाईम ट्रांसलेटर घेतात. याशिवाय, प्रकाशनात सहभागी होऊन तुम्ही मोठी कमाई करू शकता. हजारो पानांचे पुस्तक एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवादित केले जाते. या क्षेत्रात तुम्ही तुमच्यासोबत अनेकांना रोजगार देऊ शकता. याशिवाय आजकाल वेबसाइट डिझायनर आणि डेव्हलपरला विशेष मागणी आहे. अशा लोकांशी संपर्क साधून तुम्ही मोबाईल अॅप आणि वेबसाइट बनवण्याचे काम सुरू करू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications