Draw ten thousand today; Take a million loss tomorrow! How appropriate to withdraw money from PF?
EPFO Alert: आज दहा हजार काढा; उद्या लाखाचा फटका घ्या! पीएफमधून पैसे काढणे किती योग्य? By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 11:15 AM1 / 9केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना भविष्यनिर्वाह निधीतून (पीएफ) पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अनेकदा असे दिसून आले आहे की, नागरिक क्षुल्लक कारणांसाठीही पीएफमधील पैसे काढून घेत असतात. 2 / 9मुदत पूर्ण होण्याआधीच असे पैसे काढल्याने मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेवर याचा होणारा परिणाम कुणीही विचारात घेत नाही. 3 / 9नोकरी गेल्यास महिन्याभराच्या अवधीनंतर त्या कर्मचाऱ्याला पीएफ खात्यातून ७५ टक्के रक्कम काढता येते. उर्वरित २५ टक्के रक्कम नोकरी गेल्यानंतर दोन महिन्यांनी काढता येते.4 / 9पीएफवर सध्या ८.१५ टक्के दराने व्याज मिळते. व्याजाची रक्कम तुमच्या खात्यात जमा होत असते. त्यामुळे मिळणाऱ्या निवृत्ती निधीत तसेच पेन्शनच्या रकमेत वाढ होते असते. 5 / 9नोकरीतून निवृत्त होण्यासाठी ३० वर्षे असताना जर पीएफ खात्यातून १० हजार रुपये काढले तर निवृत्तीनंतर १ लाख १४ हजार रुपये कमी मिळतात. यापेक्षा अधिक पैसे काढल्यास त्या व्यक्तीचे अधिक नुकसान होते. 6 / 9कारण अट रक्कम 7 / 9घर खरेदी/बांधणे सलग ५ वर्षांची नोकरी पगाराच्या २४ ते ३६ पट; आरोग्य उपचार अट नाही मासिक वेतनाच्या ६ पट इतकी8 / 9गृहकर्ज फेड सलग ३ वर्षांची नोकरी ९० टक्के रक्कम; घरदुरुस्ती सलग ५ वर्षांची नोकरी मासिक पगाराच्या १२ पट इतकी9 / 9विवाह सलग ५ वर्षांची नोकरी व्याजासह कर्मचाऱ्यांच्या योगदानाच्या ५०% इतकी आणखी वाचा Subscribe to Notifications