शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शेतकऱ्यांना ड्रोनच्या खरेदीवर मिळतंय अनुदान, त्वरित करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 2:43 PM

1 / 9
शेतकऱ्यांना आधुनिक शेतीबाबत जागरूक करण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. त्याचा परिणामही आता दिसू लागला आहे. शेतकऱ्यांनी शेतीमध्ये अनेक नवनवीन तंत्रांचा अवलंब केला.
2 / 9
आता शेतकरी शेतीसाठी ड्रोनचा वापर करत आहेत. ड्रोन खरेदीवर सरकार शेतकऱ्यांना अनुदान देत आहे. शेतकरी बांधव यासाठी अर्ज करू शकतात.
3 / 9
शेतकऱ्यांना ॲग्री ड्रोन खरेदीवर ६० टक्के अनुदान दिलं जाणार आहे. अशा परिस्थितीत सरकारी अनुदानाचा फायदा घेऊन शेतकरी कमी किमतीत कृषी ड्रोन खरेदी करू शकतात. कृषी विभागाच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
4 / 9
कृषी विभागानं प्रत्येक उपविभागासाठी एक ड्रोन खरेदी करण्यासाठी निवडलेल्या १०१ लाभार्थ्यांची पात्रता निश्चित केली आहे. ड्रोनसाठी लाभार्थ्यांची निवड जिल्हास्तरावर केली जाईल.
5 / 9
तत्काळ अनुदानासाठी चार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, ड्रोनद्वारे कीटकनाशके आणि खतांची फवारणी केल्यास ३० ते ३५ टक्के पिकांचे नुकसान वाचेल.
6 / 9
निवड झालेल्या शेतकऱ्यांना ड्रोन पायलट प्रमाणपत्रासाठी प्रशिक्षण दिलं जाईल. प्रशिक्षणाचा खर्च कृषी विभाग उचलणार आहे. एक ड्रोन तीन लोकांना सेवा देईल.
7 / 9
शेतकऱ्यांव्यतिरिक्त, एफपीओ, कृषी यंत्र बँका, एसएचजी, एनजीओ, परवानाधारक खत-बियाणे विक्रेते, खाजगी कंपन्या आणि नोंदणीकृत संस्था देखील ड्रोन अनुदानासाठी अर्ज करू शकतात.
8 / 9
कृषी प्रयोजनासाठी ड्रोन खरेदीवर सरकार अनुदान देत आहे. खरेदीदार सौदा करून त्यांच्या आवडीचे ड्रोन खरेदी करू शकतात. अनुदान थेट ड्रोन विक्रेत्याच्या खात्यात जमा केले जाईल.
9 / 9
विक्रेत्याला खरेदी केलेल्या ड्रोनची संपूर्ण माहिती सरकारला द्यावी लागेल. निवडलेल्या लाभार्थीला नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) कडून एनओसी प्राप्त करून डिजिटल स्काय प्लॅटफॉर्मवर नोंदणी करावी लागेल.
टॅग्स :Farmerशेतकरीbusinessव्यवसाय