during atm transaction beware of online fraud follow these tips
ATM चा वापर करताना 'ही' काळजी घ्या; अन्यथा होईल मोठं नुकसान By कुणाल गवाणकर | Published: November 29, 2020 3:40 PM1 / 10डिजिटल बँकिंगचा जमाना असला तरीही रोखीत व्यवहार करणाऱ्यांची संख्या अतिशय मोठी आहे. बँकेत जमा असलेली रोख रक्कम काढण्यासाठी एटीएमचा वापर करतात.2 / 10एटीएमच्या माध्यमातून घडणाऱ्या गुन्ह्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे एटीएम वापरताना काळजी घेणं गरजेचं आहे.3 / 10कायम गर्दीच्या ठिकाणी असलेल्या एटीएमचा वापर करा. फारशी वर्दळ नसलेल्या ठिकाणी जास्त फसवणुकीचे अधिक प्रकार घडतात.4 / 10एटीएममधून रोकड काढत असताना आसपास लक्ष ठेवा. कोणी तुमच्यावर लक्ष तर ठेवत नाहीए ना, याची खात्री करून घ्या.5 / 10एटीएममधून रोकड काढल्यावर मिळणारी पावती कुठेही फेकून नका. या पावतीवर असलेल्या मजकुराचा गैरवापर होऊ शकतो.6 / 10व्यवहार पूर्ण झाल्यावर नेहमी कॅन्सल बदल दाबा. एटीएममधून निघताना कार्ड सोबत घेतलंय ना, याची काळजी घ्या.7 / 10सीसीटीव्ही कॅमेरा, सुरक्षारक्षक असलेल्या एटीएमचा वापर करा. रोकड काढताना अपरिचित व्यक्तीची मदत घेऊ नका.8 / 10एटीएममधून बाहेर पडण्याआधीच रोकड मोजून घ्या. सार्वजनिक ठिकाणी रोकड मोजू नका.9 / 10तुमच्या खात्यातून रोख रक्कम काढली गेल्याचा मेसेज आल्यास, पण एटीएममधून रोख न आल्यास तात्काळ बँकेकडे तक्रार करा.10 / 10तुमचा पिन नंबर कोणालाही सांगू नका. बँक कधीही तुमचा पिन क्रमांक, पासवर्ड मागत नाही. त्यामुळे एसएमएसच्या माध्यमातून विचारणा होत असल्यास अशी कोणतीही माहिती देऊ नका. आणखी वाचा Subscribe to Notifications