E-Shram Card: Who Can Apply For E Shram Card, Know Benefits Of E Shram Card
पीएफ खातेधारक आपले ई-श्रम कार्ड बनवू शकतात का? कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या, सविस्तर... By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2022 4:10 PM1 / 7नवी दिल्ली : देशातील मोठ्या प्रमाणावर असंघटित क्षेत्राशी संबंधित मजूर आणि कामगार सध्या ई-श्रम पोर्टलला भेट देऊन त्यांचे लेबर कार्ड मिळवत आहेत. भारत सरकारने 2021 मध्ये हे पोर्टल सुरू केले. 2 / 7सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा लाभ असंघटित क्षेत्राशी संबंधित मजूर आणि कामगारांपर्यंत पोहोचवणे हा ई-श्रम पोर्टल सुरू करण्याचा उद्देश आहे. आकडेवारीनुसार, ई-श्रम पोर्टलद्वारे आतापर्यंत 18 कोटींहून अधिक कामगारांची नोंदणी झाली आहे.3 / 7ई-श्रम कार्डचे अनेक फायदे आहेत. यामुळे कामगार आणि मजुरांना रोजगार मिळण्याची शक्यता वाढते. याशिवाय, त्यांना सरकारकडून 2 लाख रुपयांचा अपघात विमाही दिला जातो.4 / 7याचबरोबर, दुसरीकडे याबाबत अनेकांच्या मनात संभ्रमावस्था आहे. ई-श्रम कार्ड बनवण्यासाठी कोण अर्ज करू शकतो, असा प्रश्न त्यांच्यात निर्माण होत आहे. याशिवाय, इतर अनेक लोकांचा प्रश्न आहे की, पीएफ धारकांना त्यांचे ई-श्रम कार्ड बनवता येईल का? 5 / 7अलीकडेच, श्रम आणि रोजगार मंत्रालयाने एका ट्विटमध्ये माहिती दिली आहे की, असंघटित क्षेत्राशी संबंधित कोणताही मजूर त्यांचे ई-श्रम कार्ड बनवू शकतो. ट्विट करताना एका युजरने प्रश्न विचारला होता की बांधकामाचे ई-श्रम कार्ड बनवता येईल का?6 / 7याला उत्तर देताना, श्रम आणि रोजगार मंत्रालयाने सांगितले की, बांधकाम कामगार, स्थलांतरित मजूर, रस्त्यावरील विक्रेते, घरगुती कामगार, कृषी कामगार आणि इतर कोणतेही कामगार त्यांचे ई-श्रम कार्ड बनवू शकतात, जे ESIC आणि EPFO चे सदस्य नाहीत. ESIC आणि EPFO चे सदस्य ई-श्रम कार्ड बनवू शकत नाहीत. 7 / 7असंघटित क्षेत्राशी निगडित लोकांना लक्षात घेऊन हे तयार करण्यात आले आहे. ई-श्रम कार्ड बनवून कामगार, कामगारांचे रेकॉर्ड सरकारकडे येते. अशा परिस्थितीत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा लाभ थेट या लोकांना मिळणे सोपे आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications