e shram portal get more than 2 5 crore registrations check all details
मोदी सरकारचा मेगा प्लान! ३८ कोटी स्थलांतरित कामगारांना होणार मोठा फायदा; पाहा, नोंदणी प्रक्रिया By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2021 10:37 AM1 / 10अलीकडेच श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी ई-श्रम पोर्टलचा शुभारंभ केला. श्रम आणि रोजगार आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्य मंत्री रामेश्वर तेली यांच्या उपस्थितीत ते राज्य/केंद्रशासित प्रदेशांकडे हस्तांतरित केले.2 / 10यानंतर आता देशभरातील २.५ कोटींहून अधिक असंघटित कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली आहे, अशी माहिती कामगार मंत्रालयाने दिली आहे. हे पोर्टल म्हणजे स्थलांतरित कामगार, बांधकाम कामगार, गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसह असंघटित कामगारांचा पहिला डेटाबेस आहे.3 / 10कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले की, चौथ्या आठवड्यात १.७१ कोटीपेक्षा जास्त असंघटित कामगारांची नोंदणी झाली आणि ५ व्या आठवड्यात एकूण २.५१ कोटीहून अधिक नोंदणी झाली आहे.4 / 10ई-श्रम पोर्टल देशातील ३८ कोटीहून अधिक असंघटित कामगारांची मोफत नोंदणी करणार असून त्यांना सामाजिक सुरक्षा योजनांसंबंधीच्या वितरणासाठी मदत करणार आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांचा डेटाबेस तयार करण्यासाठी आणि त्यांची देखभाल करण्यासाठी गेल्या महिन्याच्या अखेरीस ई-श्रम पोर्टल सुरू करण्यात आले आहे.5 / 10जर एखाद्या कामगाराने ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली, तर त्याला २ लाख रुपयांच्या अपघाती विम्याचा लाभ मिळेल. यामध्ये सरकारकडून एक वर्षाचा हप्ता दिला जाईल. तसेच अंशत: अपंगांसाठी विमा योजनेअंतर्गत एक लाख रुपये दिले जातील.6 / 10जर नोंदणीकृत मजूर अपघाताचा बळी ठरला असेल, त्याचा मृत्यू झाला असेल किंवा संपूर्ण अपंगत्व आले असल्यास त्याला दोन लाख रुपये मिळतील. ज्या कामगारांना पोर्टलवर नोंदणी करायची आहे त्यांच्या मदतीसाठी सरकारने राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक - १४४३४ प्रसिद्ध केला आहे. 7 / 10पोर्टलवर उपलब्ध असलेली माहिती राज्य सरकारांच्या विभागांसोबतही शेअर केली जाईल. हे पोर्टल बांधकाम कामगार, स्थलांतरित कामगार, गिग आणि प्लॅटफॉर्म कामगार, रस्त्यावरील विक्रेते, घरगुती कामगार, कृषी कामगार, दुग्ध व्यवसायी, मच्छीमार, ट्रक चालकांसह सर्व असंघटित क्षेत्रातील कामगारांना मदत करेल.8 / 10असंघटित आणि १६-५९ वयोगटातील कोणताही कामगार ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करू शकेल. या पोर्टलचा उद्देश सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि त्यांचे बँक खाते लिंक करणे आहे.9 / 10ई-श्रम पोर्टलवरील नोंदणी पूर्णपणे विनामूल्य असून कोणीही सरकारी फायद्यासाठी नोंदणी करू शकतो. मात्र, त्यांचे वय १६ ते ५९ दरम्यान असावे. तसेच, ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी त्याला आयकर भरणा करण्याची गरज नाही.10 / 10नवीन ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला फक्त काही कागदपत्रांची आवश्यकता असेल. सर्व प्रथम, तुम्हाला तुमचे आधार कार्ड आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर लागेल. जर कामगाराकडे आधार कार्ड नसेल तर तो त्याच्या जवळच्या CSC ला भेट देऊ शकतो आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे नोंदणी करू शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications