earn money with basil (Tulsi) cultivation and get more profit with this business
अवघ्या 15 हजारांत सुरू करा तुळशीची शेती; 3 लाखांपर्यंत होईल कमाई! By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 3:39 PM1 / 8नवी दिल्ली: जर तुम्ही शेतीमधून कमाई करण्याचा विचार करत आहात, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. या शेतीतून लाखो रुपयांची कमाई करता येऊ शकते आणि हा व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशांची गुंतवणूकही कमी करावी लागते.2 / 8तुळशीच्या (Tulsi) शेतीतून कोणीही भरघोस कमाई करू शकते. तुळशीच्या (Basil) शेतीतून कशी करता येईल जास्त कमाई, ते जाणून घ्या...3 / 8तुळशीची शेती करण्यासाठी अधिक गुंतवणुकीची गरज नाही. त्याशिवाय तुळशीची मागणीही मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येत घरात तुळशीचं रोपटं असतंच. तसंच, याचा वापर औषधांमध्ये, पूजेसाठीही आणि इतरही गोष्टींमध्ये केला जातो.4 / 8कोरोना काळात देशभरात लोकांचा आयुर्वेदिक आणि नॅच्युरल औषधांकडे कल वाढला आहे. त्यामुळे याची मागणीही मोठ्या प्रमाणात आहे. 5 / 8सध्या तुळशीचा बाजारही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशात औषधांची रोपटी (Medicinal Plants) लावण्याचा व्यवसाय सुरू केल्यास, फायदेशीर ठरू शकतो.6 / 8हा व्यवसाय सुरू करण्यासाठी भल्यामोठ्या रकमेसह, मोठ्या जागेचीही गरज लागत नाही. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगद्वारेही हा व्यवसाय सुरू करता येतो.7 / 8तुळशीची शेती सुरू करण्यासाठी सुरुवातीला 15000 रुपये खर्च करावे लागतील. पेरणीनंतर 3 महिन्यांनी तुळशीचं पीक सरासरी 3 लाख रुपयांना विकले जाते.8 / 8बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक आयुर्वेदिक कंपन्या डाबर, वैद्यनाथ, पतंजली अशा अनेक कंपन्या तुळशीची कॉन्ट्रॅक्टवर शेती करत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications