earn money from business namkeen business in india get 2 lakhs proift every month
Business Ideas : 'हा' व्यवसाय सुरू केल्यास दरमहा होईल 2 लाखांची कमाई, अशी करा सुरुवात... By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2022 8:08 AM1 / 5नवी दिल्ली : जर तुम्हाला एखादा व्यवसाय (Business Idea) करून पैसे कमावायचे असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. या बातमीत आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला दरमहा किमान 2 लाख रुपये मिळत राहतील. हा व्यवसाय नमकीनशी (फरसाण) संबंधित आहे.2 / 5देशात चहा नंतर सर्वात जास्त लोकांना आवडणारी गोष्ट म्हणजे नमकीन आहे. तुमच्या घरातील स्वयंपाकघरातील हे एक महत्त्वाचे साहित्य आहे. नमकीनचा व्यवसाय सुरू करून तुम्ही प्रचंड नफा कमवू शकता. तुम्ही त्याची सुरुवात छोट्या किंवा मोठ्या स्तरापासून करू शकता. तुमच्या खर्चानुसार तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.3 / 5नमकीन आज देशातील प्रत्येक घरात नाश्तापासून संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये वापरला जातो. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 300 ते 500 चौरस फूट जागा लागेल. यासाठी तुम्ही तुमच्या घराचा कोणताही भाग घेऊ शकता. तसेच तुम्हाला FSSAI रजिस्ट्रेशन आणि फूड लायसन्स घ्यावे लागेल.4 / 5तुम्हाला पहिल्यांदा कच्चा माल ठेवावा लागेल, तरच तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. कच्च्या मालामध्ये तुम्हाला तेल, डाळी, बटाटे, बेसन, शेंगदाणे आणि मसाले लागतील. याचा वापर करून तुम्ही चांगले स्नॅक्स बनवू शकता. तसेच तुम्हाला काही मशीन्सचा समावेश करावा लागेल.5 / 5या व्यवसायात तुमचा खर्च किमान 2 लाख ते 8 लाख रुपयांपर्यंत येऊ शकतो. या व्यवसायात तुम्हाला सुरवातीलाच 20 ते 30 टक्के नफा मिळेल. जर तुम्ही 8 लाख रुपये खर्च केले तर तुम्हाला नक्कीच 30 टक्के नफा मिळेल म्हणजेच तुम्ही एका महिन्यात 2 लाख 40 हजार रुपये कमवाल. आणखी वाचा Subscribe to Notifications