शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' वनस्पतीच्या व्यवसायातून करू शकता चांगली कमाई; जाणून घ्या कसा होईल फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 5:04 PM

1 / 8
नवी दिल्ली: कोरोना संकट काळात अनेक लोकांची नोकरी गेली. यानंतर अधिकतर लोक व्यवसायाकडे वळले आहेत. याच पार्श्वभूमीवर कमी गुंतवणुकीत अधिक फायद्याच्या दृष्टीने व्यवसाय करण्याची एक चांगली संधी आहे. मात्र, यामध्ये शेती, फार्मिंगबाबत काहीशी माहिती असणे महत्त्वाचे असणार आहे.
2 / 8
लेमन ग्रास (Lemon Grass) म्हणजेच गवती चहाच्या शेतीद्वारे चांगली कमाई करता येऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लेमन ग्रास शेतीसाठी प्रोत्साहन दिले आहे. लेमन ग्रास एक औषधी वनस्पती आहे. याचा वापर मेडिसिन, कॉस्मेटिक आणि डिटरजेंटमध्ये केला जातो.
3 / 8
ही शेती करण्याचा सर्वात चांगला कालावधी फेब्रुवारी ते जुलैदरम्यान असतो. एकदा याची शेती केल्यानंतर कमीत-कमी 6 ते 7 वेळा छाटणी करता येते. लेमन ग्रास शेती केल्यानंतर जवळपास 3 ते 5 महिन्यानंतर याची पहिली छाटणी केली जाते.
4 / 8
लेमन ग्रासचा वापर तेल काढण्यासाठी केला जातो. या ग्रासच्या एक लिटर तेलाची किंमत जवळपास 1 हजार रुपयांपासून ते 1500 रुपयांपर्यंत असते.
5 / 8
ही गोष्ट समजून घेण्यासाठी ही वनस्पती तोडल्यानंतर यात लिंबासारखा स्ट्रॉंग सुगंध आल्यास, लेमन ग्रासची शेती तयार झाली असे समजावे.
6 / 8
जमिनीपासून 5 ते 8 इंचावर याची छाटणी करावी. दुसऱ्या छाटणीमध्ये 1.5 ते 2 लिटर तेल निघते. तीन वर्षात याची उत्पादन क्षमता वाढते.
7 / 8
ही शेती करण्यासाठी जवळपास 30 ते 40 हजार रुपयांपर्यंत खर्च येईल.
8 / 8
लेमन ग्रासमधून एका वर्षात 1 लाख ते 1.50 लाख रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते. खर्चात कपात केल्यानंतर वर्षभरात 70 हजार ते 1.20 लाख रुपयांपर्यंत प्रॉफिट होऊ शकतो.
टॅग्स :businessव्यवसायMONEYपैसाFarmerशेतकरी