earn money online by registering as seller on amazon and flipkart
ऑनलाइन वस्तू विकून तुम्हीही कमवू शकता पैसे! Amazon आणि Flipkart वर घरबसल्या उघडा दुकान By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 1:26 PM1 / 7ऑनलाईन शॉपिंगची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. बाहेर पडून दुकानातून वस्तू खरेदी करण्यात वेळ घालवण्यापेक्षा लोक घरबरसल्याच ऑर्डर करत आहेत. 2 / 7येत्या २ दिवसात फ्लिपकार्टच्या ‘बिग बिलियन डेज’ आणि अॅमेझॉनच्या ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल’ची सुरुवात होत आहे. या सेलमधून ई कॉमर्स कंपन्या बक्कळ नफा कमावतात. या संधीतून तुम्ही पैस कमावू शकता.3 / 7जर तुम्ही बराच काळ तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या आधीच अस्तित्वात असलेल्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल, तर Amazon आणि Flipkart तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. 4 / 7Amazon आणि Flipkart वर तुमचे उत्पादन विकून तुम्ही मोठी कमाई करू शकता. हे करण्यासाठी, तुम्हाला Amazon आणि Flipkart वर विक्रेता म्हणून नोंदणी करावी लागेल.5 / 7सर्वप्रथम तुम्हाला sell.amazon.in या वेबसाइटवर जावे लागेल. येथे तुम्हाला तुमच्या स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यात ‘Start Selling’ हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. याठिकाणी तुम्हाला Amazon खात्यात लॉगइन करावं लागेल. तुमच्याकडे नसेल तर नवीन खातं उघडू शकता.6 / 7यानंतर तुम्हाला तुमचा जीएसटी क्रमांक टाकावा लागेल. तुम्ही जीएसटी लागू नसलेले कोणतेही उत्पादनाची विक्री करत असल्यास तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक टाकावा लागेल आणि तुम्हाला पॅन कार्डचा फोटो अपलोड करावा लागेल.7 / 7यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरसाठी नाव निवडावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमचे उत्पादन शिपिंगची माहिती द्यावी लागेल. येथे तुम्हाला तुमच्या उत्पादनाचा आकार, डिलिव्हरीचा वेग तसेच पिकअपचा पत्ता टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स टाकावे लागतील. ही सर्व माहिती टाकल्यानंतर तुम्ही तुमचा माल Amazon वर विकू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications