Economy Lipstick Effect : अर्थतज्ज्ञ लावतात लिपस्टिक आणि अंतर्वस्त्रांच्या विक्रीवरून मंदीचा अंदाज; जाणून घ्या विचित्र थिअरी By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 2:41 PM
1 / 7 अर्थव्यवस्थेची (Economy) स्थिती जाणून घेण्यासाठी अर्थतज्ज्ञ अनेक प्रकारची आकडेवारी आणि ट्रेंडची मदत घेतात. पण, तुम्हाला माहिती आहे का की लिपस्टिक (Lipstick) आणि अंतर्वस्त्रांची (Underwear) विक्री देखील अर्थव्यवस्थेची स्थिती सांगते? हे अगदी खरं आहे. याला लिपस्टिक इफेक्ट (Lipstick Effect) असं म्हटलं जातं. 2 / 7 लिपस्टिक इफेक्ट अनेकदा जागतिक अर्थव्यवस्थेवर अनेकवेळा दिसून आला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जेव्हा अर्थव्यवस्थेत मंदी असते किंवा इतर काही दबाव असतो तेव्हा स्त्रिया महागड्या गोष्टींवरील खर्च कमी करतात. परंतु त्या अशा काही आवडत्या वस्तूंच्या खरेदीवर अधिक खर्च करतात ज्या बजेटवर अधिक परिणाम करत नाही. लिपस्टिक ही अशीच एक गोष्ट आहे. या संकल्पनेला लिपस्टिक इफेक्ट म्हणतात. 3 / 7 अमेरिकेमध्ये, सेंसस ब्युरोने किरकोळ विक्रीची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार जुलैमध्ये किरकोळ विक्री स्थिर राहिली आहे. याचा अर्थ महागाईचा परिणाम अमेरिकन लोकांच्या बजेटवर होत आहे. GDP मध्ये कंझ्युमर स्पेडिंगचा दोन तृतीयांश वाटादेखील आहे. 4 / 7 लिपस्टिक इफेक्ट पहिल्यांदा २००१ मध्ये मंदीच्या काळात चर्चेत आला. तेव्हा असे दिसून आले की अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट असतानाही लिपस्टिकची विक्री वाढली होती. हे १९२९ आणि १९९३ च्या महामंदी दरम्यान देखील दिसून आले होते. त्याला 'लिपस्टिक इंडेक्स' असे नाव देण्यात आले. या सिद्धांतानुसार, अर्थव्यवस्थेची स्थिती आणि सौंदर्यप्रसाधनांची विक्री यांच्यात विपरित संबंध आहे. 5 / 7 आतादेखील लिपस्टिक इफेक्ट दिसत आहे. NPD विश्लेषक नतालिया बांबिझा यांच्या मते, २०२२ च्या पहिल्या तिमाहीत लिपस्टिकची विक्री एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत ४८ टक्क्यांनी वाढली आहे. अमेरिकेसह जगातील अनेक मोठ्या देशांतील लोकांच्या बजेटवर उच्च महागाईचा परिणाम झाल्याचंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 6 / 7 अंतर्वस्त्राच्या (Underwear) विक्रीचा अर्थव्यवस्थेच्या स्थितीशी संबंध असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. २००८ मध्ये अमेरिकेत मंदी आली. त्यानंतर यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हचे प्रमुख एलेन ग्रीनस्पॅन म्हणाले होते की, अंतर्वस्त्राच्या (Underwear) विक्रीतून अर्थव्यवस्थेच्या स्थितीची कल्पना येऊ शकते. मंदीच्या काळात पुरुष नवीन अंतर्वस्त्रे खरेदी करणे बंद करतात. या काळात म्हणूनच लोक ज्या गोष्टी सर्वांना समोर दिसतात अशावरच खर्च करतात, असंही त्यांनी सांगितलं. 7 / 7 जेव्हा अर्थव्यवस्थेत मंदी येते तेव्हा डेटिंग वेबसाइटची कमाई देखील वाढते. याचे कारण म्हणजे नोकऱ्या गेल्यामुळे लोकांना घरातच राहण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा परिस्थितीत ते वेळ घालवण्यासाठी डेटिंग वेबसाइट्सचा वापर करतात. २००९ मधील मार्केट क्रॅश दरम्यान Match.com चा चौथ्या तिमाहीचा नफा सात वर्षांमध्ये सर्वाधिक होता. आणखी वाचा