शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

IPO Investment Multibagger Share : 'या' IPO मध्ये गुंतवणूक केलेले झाले कोट्यधीश; वर्षभरात १.२२ लाखांचे झाले १ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 6:09 PM

1 / 9
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला होता. परंतु यादरम्यान शेअर बाजारात अनेक स्टॉक्स मल्टीबॅगरचच्या लिस्टमध्ये (Multibagger Stocks) आपलं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले. काही कंपन्यांनी तर पहिल्यांदाच बाजारात एन्ट्री घेतली.
2 / 9
यापैकी एक कंपनी होती ती म्हणजे EKI एनर्जी सर्व्हिसेस लिमिडेट. EKI एनर्जी सर्व्हिसेसचा (EKI Energy IPO) आयपीओ गेल्या वर्षी २०२१ मध्ये आला होता. २४ मार्च रोजी आयपीओसाठी हा शेअर खुला करण्यात आला होता.
3 / 9
या शेअरचं लिस्टिंग एप्रिल २०२१ मध्ये झालं होतं. याचं लिस्टिंग बीएसई एमएसई (BSE MSE) मध्ये झालं होतं. या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे आजच्या तारखेस कोट्यधीश झाले आहेत.
4 / 9
आपल्या लिस्टिंगच्या दिवशी हा पब्लिक इश्यू ३७ टक्के अधिक प्रीमिअमसह १४० रुपयांवर उघडला. या आयपीओचा प्राईज बँड १०० ते १०२ रुपये होता. हा शेअर शुक्रवारी ८ एप्रिल २०२२ रोजी बीएसईवर ८५११ रुपयांवर बंद झाला.
5 / 9
या शेअरची सध्याची किंमत ८,५११ रुपये आहे. ही किंमत त्याच्या लिस्ट झालेल्या दिवसाच्या किंमतीच्या म्हणजेच प्राईस बँड १०२ रुपये प्रति इक्विटी शेअरच्या किंमतीपेक्षा सुमारे ८२४४.१२ टक्के (Multibagger stock return) जास्त आहे.
6 / 9
EKI Energy Services Limited IPO चा शेअर १०० ते १०२ रुपये या दराने ऑफर करण्यात आला होता. या इश्यूसाठी १२०० शेअर्स लॉटमध्ये होते. अशा परिस्थितीत गुंतवणूकदाराला या IPO मध्ये अर्ज करण्यासाठी १,२२,४०० रुपयांची गुंतवणूक करावी लागली.
7 / 9
जर या मल्टीबॅगर IPO मध्ये आपली गुंतवणूक एखाद्यानं आतापर्यंत कायम ठेवली असेल तर त्याचे १,२२,४०० रुपयांचं मूल्य आज १.०२ कोटी रुपये झालं असते. दरम्यान, या स्टॉकनं गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे.
8 / 9
कंपनी क्लायमेट चेंज अॅडव्हाझरी, कार्बन क्रेडिट ट्रेडिंग, बिझनेस एक्सिलन्स अॅडव्हायझरी आणि इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिटची सेवा प्रदान करते. कंपनीचा मुख्य व्यवसाय कार्बन क्रेडिटचा व्यापार आहे. भारताचा कार्बन बाजार हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक आहे आणि येथे लाखो कार्बन क्रेडिट्स निर्माण झाले आहेत.
9 / 9
जेव्हा EKI Energy चा शेअर लिस्ट झाला होता, तेव्हा याचं मार्केट कॅप १८ कोटी रुपये होते. हे मार्केट कॅप आता ५०९३ कोटी रुपये झाले आहे. ही कंपनी मार्च २०२१ पर्यंत पूर्णपणे कर्जमुक्त कंपनी आहे. त्याच वेळी, कंपनीमध्ये प्रवर्तकांचा हिस्सा ७३.५ टक्के आहे.
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकIPOइनिशिअल पब्लिक ऑफरिंग