शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोणते शेअर खरेदी करायचे? कधी विकायचे? गुंतवणूकदारांना मस्ककडून मोलाचे सल्ले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2022 6:52 PM

1 / 8
गेल्या काही वर्षांत उद्योगपती एलन मस्क यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. मस्क सध्या जगातले सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. सोशल मीडियावर ते सातत्यानं सक्रिय असतात. ट्विटर खरेदी केल्यानंतर आता मस्क यांनी गुंतवणूकरदारांना मोलाचा सल्ला दिला आहे.
2 / 8
ट्विटर खरेदी केल्यानंतर आता मस्क यांची नजर कोकाकोलावर आहे. मस्क यांनी एक ट्विट करत शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे.
3 / 8
शेअर बाजारातील गुंतवणूक म्हणजे जोखीम. कोणते शेअर खरेदी करायचे, कशामध्ये पैसे गुंतवायचे, कधी विकायचे, असे प्रश्न अनेकांना पडतात. अशा व्यक्तींना मस्क यांनी सल्ला दिला आहे. त्यांचे सल्ले गुंतवणूकदारांसाठी 'कामाचे' ठरू शकतात.
4 / 8
चांगले शेअर कसे निवडायचे, ते कधी विकायचे, याबद्दल मस्क यांनी ट्विटरवरून मार्गदर्शन केलं आहे. अनेक कंपन्यांचे शेअर खरेदी करा. तुम्हाला ज्या उत्पादनं आणि सेवांवर विश्वास आहे, अशा कंपन्यांचे शेअर खरेदी करा, असं मस्क सांगतात.
5 / 8
खरेदी केलेले शेअर तेव्हाच विका, जेव्हा तुम्हाला वाटतं की त्या कंपनीचं उत्पादन किंवा सेवा खराब झाली आहे. बाजारात पडझड होते, तेव्हा घाबरू नका. तो दीर्घकाळसाठी तुम्हाला फायदेशीर ठरतो, असा सल्ला मस्क यांनी दिला.
6 / 8
शेअर बाजार आणि गुंतवणुकीचे सल्ले मस्क यांनी दिले आहेत. मस्क यांनी ट्विट करत गुंतवणूकदारांना मार्गदर्शन केलं. त्यांच्या ट्विटची वेळ महत्त्वाची आहे. ट्विटर खरेदी केल्यानंतर मस्क यांनी त्यांच्याकडे असलेले टेस्लाचे काही शेअर विकले. त्यानंतर मस्क यांनी ट्विट केलं.
7 / 8
अमेरिकेतील शेअर बाजार नियामक संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, मस्क यांनी विकलेल्या शेअर्सचं मूल्य ८.५ बिलियन डॉलर आहे. मस्क यांनी टेस्लाचे एकूण ९६ लाख शेअर्स विकले. त्यांची किंमत ८२२.६८ डॉलर ते ९९९.१३ डॉलरच्या दरम्यान आहे.
8 / 8
मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर टेस्लाचे शेअर गडगडले. ट्विटर मस्क यांच्या ताब्यात आल्यानंतर टेस्लाच्या शेअरमध्ये १२ टक्क्यांनी घसरली. टेस्लाच्या शेअरची ही गेल्या दीड वर्षांतली खराब कामगिरी आहे.
टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कTwitterट्विटर