Elon Musk Leaves Fate Of His 21 Billion dollar Tesla Stock On Twitter Poll
Elon Musk : Tesla चे शेअर्स विकू की नाही?; एलॉन मस्क यांनी नेटकऱ्यांना विचारला प्रश्न, पाहा काय आहे प्रकरण By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2021 5:56 PM1 / 12Elon Musk Tesla Shares : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि इलेक्ट्रीक कार चं उत्पादन करणआरी कंपनी टेस्लाचे मालक (Electric Vehicle Tesla Owner) यांनी एक ट्वीट करत सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का दिला आहे.2 / 12आपले टेस्लाचे १० टक्के शेअर्स विकावेत का याबाबत त्यांनी ट्विटरवर आपल्या फोलोअर्सकडे सल्ला मागितला आहे. त्यांचं हे ट्विट अशावेळी आलं आहे, जेव्हा अमेरिकेत डेमोक्रॅट्सकडून बिलेनियर टॅक्सचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.3 / 12'अलीकडे कर टाळण्यामुळे खूप अवास्तव फायदा झाला आहे. म्हणून मी टेस्लाचे १० टक्के शेअर्स विकण्याचा प्रस्ताव ठेवतो,' असं एलॉन मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे. 4 / 12'ना मी कुठून बोनस घेतो ना मला कोणता पगार मिळतो. अशातच कराची रक्कम देण्यासाठी माझ्याकडे टेस्लाचे शेअर्स विकण्याचाच पर्याय उपलब्ध आहे. जो काही याचा परिणाम होईल तो स्वीकारला जाईल,' असंही मस्क यांनी नमूद केलं.5 / 12दरम्यान, त्यांच्या या ट्वीटनंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. तसंच बहुतांश लोकांनी त्यांना १० टक्के शेअर्स विकण्याचा सल्लाही दिला. तर काही लोकांनी त्यांना कराची रक्कम भरण्यासाठी शेअर्स विकू नये असाही सल्ला त्यांना दिला.6 / 12३० जून २०२१ पर्यंत एलॉन मस्क यांच्याकडे टेस्लाचे १७०.५ मिलियन शेअर्स होते. जर त्यांनी ते शेअर्स विकले तर शुक्रवार पर्यंत त्या शेअर्सची किंमत २१ बिलियन डॉलर्स इतकी होती असं वृत्तसंस्था रॉयटर्सनं म्हटलं आहे.7 / 12मस्क यांचं ट्वीट अशा वेळी समोर आलं आहे, जेव्हा युएस काँग्रेसकडून बिलेनियर टॅक्सचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या टॅक्सचा वापर बायडेन सरकार सोशल आणि क्लायमेट चेंजशी निगडीत गोष्टी पूर्ण करण्यासाठी वापरणार आहे. मस्क यांनी यापूर्वीही या टॅक्सवर टीका केली होती.8 / 12 जगातिल सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) लवकरच भारतात स्टारलिंक (Starlink) द्वारे इंटरनेट सेवा क्षेत्रात एन्ट्री घेण्याची शक्यता आहे. यासाठी कंपनी सध्या भागीदाराच्या शोधात असल्याचं म्हटलं जात आहे. 9 / 12ज्या भारतीय कंपन्यांवर त्यांची नजर आहे त्यामध्ये रिलायन्स जिओ (Reliance Jio), व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea), भारत नेट (BharatNet) आणि Raitel यांचा समावेश आहे. मस्क यांची कंपनी स्पेसएक्सची (SpeceX) सॅटेलाईट ब्रॉडबँड कंपनी स्टारलिंक (Starlink) ग्रामीण क्षेत्राकील ब्रॉडबँड सेवांवर आपलं लक्ष केंद्रीत करू शकते.10 / 12नीति आयोगाद्वारे पहिल्या टप्प्याअंतर्गत १२ जिल्ह्यांची ओळख पटवल्यावर ब्रॉडबँड सेवा प्रदात्यांसोबत चर्चा सुरू केली जाईल. आम्ही काही कंपन्या आणि युनिव्हर्सलव सर्व्हिस ऑब्लिगेशन फंडाच्या (Universal Service Obligation Fund - USOF) आवडीचा स्तर पाहणार आहोत, अशी प्रतिक्रिया भारतातील SpaceX ची सहयोगी कंपनी स्टारलिंकचे कंट्री डायरेक्टर संजय भार्गव (Sanjay Bhargava) यांनी दिली. आम्ही निश्चित कालावधीत १०० टक्के ब्रॉडबँड योजना मिळेल जी अन्य जिल्ह्यांसाठी एक मॉडेल म्हणून काम करेल असंही ते म्हणाले.11 / 12मीडिया रिपोर्ट्सनुसार स्टारलिंकच्या सांगण्याप्रमाणे त्यांना भारतात ५ हजारांपेक्षा अधिक प्री-बुकिंग ऑर्डर्स मिळाल्या आहेत. कंपनी प्रति ग्राहक ९९ डॉलर्स अथवा ७३५० रूपये आकारात आहे. तसंच बीटा टप्प्यात ५० ते १५० एमबीपीएस प्रति सेकंद स्पीड देण्याचा दावाही करत आहे. दरम्यान, सध्या देशात रिलायन्स जिओ, एअरटेलसारख्या कंपन्या सेवा देत आहेत, अशातच मस्क हे भारतात का सेवा देऊ इच्छित आहेत, असा प्रश्न उपलब्ध केला जात आहे.12 / 12एलॉन मस्क हे स्टारलिंक द्वारे इंटरनेट सेवा पुरवत आहेत. दरम्यान, भारतात ते याची सुरूवात करू इच्छित आहेत. या सेवेची सुरूवात करण्यासाठी मस्क यांना रेग्युलेटरीच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. एलन मस्क हे अमेरिकेसहित काही देशांमध्ये आपली सेवा देत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार सध्या ही सेवा १५०० पेक्षा अधिक सॅटेलाईट्सद्वारे पुरवण्यात येत आहे. कंपनी प्रोजेक्टच्या पहिल्या टप्प्यात १२ हजार सॅटेलाईट लाँच करू शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications