शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पीएफवरील व्याजदरात कपात; ६ कोटी कर्मचाऱ्यांना झटका; जाणून घ्या तुमच्या खिशाला किती फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 4:32 PM

1 / 7
कर्मचाऱ्यांच्या उत्तम आणि सुरक्षित भविष्यासाठीच्या पीएफ डिपॉझिटवरील व्याजदरात ईपीएफओनं कपात केली आहे. ईपीएफओनं व्याजजर ८.५ टक्क्यांवरून ८.१ टक्क्यांवर आणला आहे. गेल्या ४० वर्षांत प्रथमच ईपीएफओनं व्याजदर इतके खाली गेले आहेत.
2 / 7
कर्मचाऱ्याच्या पगारातून १२ टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा होते. म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार ५० हजार असेल, तर महिन्याला पीएफ खात्यात ६ हजार रुपये जमा होतील.
3 / 7
पीएफ खात्यात कर्मचाऱ्याच्या कंपनीलादेखील १२ टक्के रक्कम जमा करायची असते. यातील ८.३३ टक्के रक्कम कर्मचाऱ्याच्या पेन्शन फंडात जाते. तर उरलेली ३.६७ टक्के रक्कम पीएफ खात्यात जाते.
4 / 7
एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार ५० हजार असल्यास त्याची कंपनी त्याच्या पीएफ खात्यात १,८३५ रुपये जमा करेल. उर्वरित ४,१६५ रुपये त्याच्या पेन्शत खात्यात जातील. पण कंपनी पेन्शन खात्यात कमाल १,२५० रुपयेच जमा करू शकते. त्या हिशोबानं उर्वरित २,९१५ रुपयेदेखील कर्मचाऱ्याच्या पीएफ फंडात जातील. यावर कंपनीकडून कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात दर महिन्याला ४,७५० रुपये जमा होतील.
5 / 7
तुमचा महिन्याचा पगार ५० हजार असल्यास तुमचं आणि तुमच्या कंपनीचं योगदान मिळून प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यात १०,७५० रुपये जमा होतात. वर्षभराचा हिशोब केल्यास ही रक्कम १.२९ लाख रुपये होते.
6 / 7
तुमचा पगार ५० हजार असल्यास आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये पीएफवर ८.५ टक्के व्याज दराच्या हिशोबानं तुमच्या पीएफवर (१.२९ लाख रुपये) १०,९६५ रुपये व्याज मिळालं असतं. मात्र ईपीएफओनं २०२१-२२ साठी व्याजदर ८.१ टक्के केला आहे. त्यामुळे आता १०,४४९ रुपये व्याज मिळेल. म्हणजेच व्याज ५१६ रुपयांनी कमी होईल.
7 / 7
देशातील ६ कोटी कर्मचाऱ्यांच्या पीएफ फंडाचं व्यवस्थापन ईपीएफओ करतं. ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजनं शनिवारी पीएफ फंडावरील व्याजदर ८.१ टक्के करण्याचा निर्णय घेतला. याचा थेट फटका कर्मचाऱ्यांना बसेल.
टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधी