शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Share Market मध्ये उत्साह, Sensex विक्रमी स्तरावर; 'या' स्टॉक्सनं केलं गुंतवणूकदारांना मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 5:08 PM

1 / 6
मध्यंतरी काही वेळासाठी घसरण झालेल्या शेअर बाजारात पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. बीएससी सेन्सेक्स आमि एनएसई निफ्ट रोज नवनवे रकॉर्ड बनवत आहे. मंगळवारी पुन्हा एकदा शेअर बाजारात वाढ झाली असून शेअर बाजाराचा निर्देशांक विक्रमी स्तरावर पोहोचला.
2 / 6
मंगळवारी कामाकाजाच्या अखेरच्या सत्रात शेअर बाजाराचा निर्देशांक 177.04 अंकांनी वाढून विक्रमी 62,681.84 अंकांवर बंद झाला. कामाकाजाच्या दरम्यान शेअर बाजाराच्या निर्देशांकानं 62887.40 अंकांचा स्तरही गाठला होता. सोमवारी कामाकाजाच्या अखेरच्या सत्रात शेअर बाजाराचा निर्देशांक 62,504.80 अंकांवर बंद झाला.
3 / 6
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही मंगळवारी वाढ झाली. यामध्ये 55.30 अंकांची वाढ होऊन तो 18,618.05 अंकांवर बंद झाला. कामकाजादरम्यान राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकानं 18,678.10 अंकाचा उच्चांकी स्तरही गाठला होता.
4 / 6
शेअर बाजाराच्या तेजीत काही कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करवून दिली. सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या शेअर्सवर नजर टाकली तर हिंदुस्थान युनिलिव्हरच्या शेअरची किंमत सर्वाधिक वाढली. तो 4.27 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.
5 / 6
याशिवाय सन फार्मा, नेस्ले, डॉ. रेड्डीज आणि टाटा स्टीलचे शेअर्स टॉप-5 मध्ये राहिले. एल अँड टी, पॉवर ग्रिड, मारुती, बजाज फिनसर्व्ह आणि इंडसइंड बँकेच्या समभागांनी मोठी घसरण दिसून आली.
6 / 6
तसेच निफ्टीमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हरचा शेअर अव्वल राहिला. तो 4.39 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. जेएसडब्ल्यू स्टील, सिप्ला, हीरो मोटोकॉर्प आणि सन फार्मा या टॉप-5 वाढ नोंदवणाऱ्या कंपन्या होत्या. तर टॉप लूझर शेअर इंडसइंड बँकेचा होता. याशिवाय कोल इंडिया, बजाज फिनसर्व्ह, आयशर मोटर्स आणि पॉवर ग्रिड यांच्या शेअर्समध्येही घसरण दिसून आली.
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक