EPF or PPF? Where is the most benefit? This plan will make a millionaire
ईपीएफ की पीपीएफ? जास्त फायदा कुठे? ही योजना बनवेल करोडपती By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 10:51 AM1 / 9दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करताना अनेकदा ईपीएफ आणि पीपीएफ हे दाेन पर्याय समाेर येतात. जवळपास सारखेच नाव असल्यामुळे गुंतवणूकदार अनेकदा संभ्रमात पडतात. ईपीएफ ही ईपीएफमध्ये नाेंदणीकृत कंपनीत नाेकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी याेजना आहे, तर जे नाेकरी करत नाहीत, अशा व्यक्तींसाठी पीपीएफ ही याेजना सरकारने आणली हाेती. यामध्ये नाेकरदार वर्गदेखील खाते उघडून गुंतवणूक करू शकताे. दाेन्ही याेजनांबाबत जाणून घेऊया...2 / 9 २०पेक्षा जास्त कर्मचारी असलेली कंपनी ईपीएफओमध्ये नोंदणी करू शकते. मूळ वेतनाच्या १२ टक्के रक्कम कर्मचाऱ्याच्या पगारातून ईपीएफ खात्यात जमा करण्यात येते. कंपनीदेखील तेवढीच रक्कम या खात्यात जमा करते.3 / 9कर्मचारी स्वेच्छेने १२ टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम खात्यात जमा करू शकताे. मात्र, कंपनी १२ टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यास बाध्य नसेल.4 / 9पीएफची रक्कम सेवानिवृत्तीनंतर किंवा नोकरी सोडल्यास कर्मचाऱ्यांना मिळते. दुसरीकडे नाेकरी सुरू केल्यास ही रक्कम ट्रान्सफर करत येते. 5 / 9८.२५ टक्के व्याज यावर्षी सरकारने ईपीएफवर देण्याचे जाहीर केले आहे. व्याजदर सरकारतर्फे दरवर्षी ठरविण्यात येताे.6 / 9ही केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणारी एक ऐच्छिक योजना आहे. कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत किंवा पाेस्ट ऑफिसात पीपीएफ खाते उघडता येते. 7 / 9व्यावसायिक, फ्रीलान्सर किंवा स्वयंराेजगार असलेलेदेखील पीपीएफ खाते उघडू शकतात. किमान ५०० रुपये दरवर्षी या खात्यात जमा करावे लागतात. जास्तीत जास्त वार्षिक ७० हजार रुपयांची मर्यादा आहे.8 / 9१५ वर्षांनी पीपीएफ खात्यात जमा केलेली रक्कम मिळते. या खात्याला ५ वर्षांची मुदतवाढही देता येते. 9 / 9आपत्कालीन परिस्थिती किंवा काही ठराविक कारणांसाठी पीपीएफ खात्यातील काही रक्कम काढता येते. ७.१ टक्के व्याज पीपीएफ खात्यावर सरकार सध्या देत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications