शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

EPFO Calculation: दर महिन्याला केवळ 'इतकं' योगदान, नंतर तुमच्या पीएफ खात्यात जमा होती ३ ते ५ कोटी; पाहा कॅलक्युलेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 10:19 AM

1 / 8
EPFO Calculation: बचत ही आपल्या भविष्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ही खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती निधी जमा करणारी संस्था आहे. तसंच पेन्शन (EPFO Pension Scheme) सारख्या योजनांचा ही लाभ दिला जातो.
2 / 8
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) खात्यांतर्गत कर्मचारी आणि एप्लॉयर या दोघांकडून समान योगदान दिलं जातं. त्याशिवाय सरकार वार्षिक व्याज देतं. यामुळे निवृत्तीपर्यंत कर्मचाऱ्यांकडे मोठी रक्कम जमा होते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला ईपीएफओ अंतर्गत कोट्यवधी रुपये जमा करायचे असतील तर जाणून घेऊया तुम्हाला किती योगदान द्यावं लागेल?
3 / 8
केंद्र सरकार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्याअंतर्गत वार्षिक आधारावर व्याजदर (EPF Interest Rate) निश्चित करते. सध्या पीएफ खात्याअंतर्गत सरकार ८.२५ टक्के व्याज देत आहे. हे व्याज दरवर्षी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केलं जातं. पीएफमध्ये जमा होणाऱ्या व्याजावर कोणताही कर लागत नाही, कारण ही करमुक्त योजना आहे.
4 / 8
ईपीएफओ कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत (EPFO Emergency Fund) पैसे काढण्याची परवानगी देते. पुढील शिक्षण, लग्न, घर बांधणी आणि आजारपण यासारख्या विशिष्ट खर्चाची पूर्तता करण्यासाठी कर्मचारी त्यांच्या ईपीएफमधून आपत्कालीन निधी काढू शकतात.
5 / 8
३ कोटींसाठी किती गुंतवणूक करावी? निवृत्तीनंतर तीन कोटी रुपये मिळण्यासाठी कर्मचाऱ्याला ४० वर्षे दरमहा ८,४०० रुपये द्यावे लागतील. सध्याच्या ८.२५ टक्के व्याजदरानं तुम्हाला एकूण ३,०१,९४,८०४ रुपये मिळतील.
6 / 8
४ कोटी जमवायचे असल्यास? जर तुम्हाला निवृत्तीनंतर ४ कोटी रुपये मिळवायचे असतील तर तुम्हाला ४० वर्षांसाठी दरमहा ११,२०० रुपये द्यावे लागतील. त्यानंतर मॅच्युरिटीवर तुम्हाला सध्याच्या ८.25 टक्के व्याजदरानं एकूण ४,०२,५९,७३८ रुपये मिळतील.
7 / 8
५ कोटी जमा करायचे असल्यास? त्याचबरोबर निवृत्तीनंतर ५ कोटी रुपये जमा करायचे असतील तर ४० वर्षांसाठी दरमहा १२,००० रुपये द्यावे लागतील. निवृत्तीनंतर तुम्हाला ८.२५ टक्के व्याजदरानं ५,०८,७०,९९१ रुपये मिळतील.
8 / 8
बॅलन्स कसा चेक कराल? जर तुमचा मोबाईल नंबर ईपीएफ खात्याशी लिंक असेल तर ९९६६०४४४२५ वर मिस्ड कॉल देऊन बॅलन्स तपासता येईल. किंवा ७७३८२९९८९९ वर EPFOHO UAN ENG टाईप एसएमएस पाठवून बॅलन्स तपासता येतो. ईपीएफ पासबुक पेजवर लॉग इन करून शिल्लक तपासता येईल. उमंग अॅपवरूनही तुम्ही बॅलन्स चेक करू शकता.
टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीInvestmentगुंतवणूक