शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खूशखबर! डिसेंबरपर्यंत EPF वर मिळेल ८.५ टक्के व्याज; सहा कोटी लोकांना होणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 6:29 PM

1 / 8
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) वित्तीय वर्ष २०१९-२० साठी जवळपास सहा कोटी भागधारकांच्या कर्मचारी भविष्य निधी (EPF) खात्यात डिसेंबरच्या अखेरपर्यंत ८.५ टक्के व्याज जमा करेल. EPFOचा हा निर्णय देशभरातील कर्मचार्‍यांसाठी अतिशय आनंददायक आहे.
2 / 8
याआधी EPFO ने सप्टेंबरमध्ये कामगारमंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली हे व्याज देण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या हप्त्यात ८.१५ टक्के आणि दुसर्‍या हप्त्यात ०.३५ टक्के व्याज द्यायला पाहिजे होते.
3 / 8
पीटीआयने सूत्रांच्या हवाल्यानुसार असे म्हटले आहे की, कामगार मंत्रालयाने अर्थमंत्रालयाला या महिन्याच्या सुरूवातीस २०१९-२० साठी EPF वर व्याज दर ८.५ टक्के (एका वेळी पूर्ण व्याज) देण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. अर्थ मंत्रालय काही दिवसांत हा प्रस्ताव मंजूर करू शकेल.
4 / 8
अशात, या महिन्यात संपूर्ण व्याज दिले जाऊ शकते. गेल्या वर्षीच्या व्याज दरावर अर्थ मंत्रालयाने काही स्पष्टीकरण मागितले होते. याबाबत सर्व उत्तरे दिली गेली आहेत. सप्टेंबरमध्ये CBT च्या आभासी बैठकीत EPFO ने गेल्या आर्थिक वर्षात ८.५ टक्के व्याज देण्याच्या आश्वासनावर शिक्कामोर्तब केले.
5 / 8
मिळालेल्या माहितीनुसार, कामगार मंत्रालयाने अर्थमंत्रालयाला २०१९-२० साठी एकावेळी ईपीएफमध्ये ८.५ टक्के व्याज जमा करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. हा प्रस्ताव या महिन्यात पाठविला गेला आहे.
6 / 8
या प्रस्तावावर अर्थ मंत्रालयाची मंजुरी काही दिवसांत अपेक्षित आहे. त्यामुळे या महिन्यात भागधारकांच्या खात्यात व्याज जमा होण्याची शक्यता आहे.
7 / 8
दरम्यान, कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली ईपीएफओचे निर्णय घेणार्‍या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (सीबीटी) बैठकीत २०१९-२० साठी ईपीएफवर ८.५ टक्के व्याजदर मंजूर करण्यात आले.
8 / 8
सीबीटीच्या मार्चमध्ये झालेल्या बैठकीत ८.५ टक्के व्याज देण्याची वचनबद्धता पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, यासह भागधारकांच्या खात्यात ८.५ टक्के व्याज दोन हप्त्यांमध्ये ८.१५ टक्के आणि ०.३५ टक्के जमा केले जाईल, असे सीबीटीने असे ठरविले होते.
टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीEmployeeकर्मचारी